शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

जमिनीला समांतर ‘गगनचुंबी इमारत’, स्थापत्यकलेची परिसीमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 04:41 IST

नैऋत्य चीनमधील चाँँगक्विंग शहरात विस्मयकारी बांधकाम सुरु आहे. गगनचुंबी इमारत म्हटले की काटकोनात केलेले प्रचंड उंचीचे बांधकाम असे चित्र डोळ््यापुढे येते.

बीजिंग: नैऋत्य चीनमधील चाँँगक्विंग शहरात विस्मयकारी बांधकाम सुरु आहे. गगनचुंबी इमारत म्हटले की काटकोनात केलेले प्रचंड उंचीचे बांधकाम असे चित्र डोळ्यांपुढे येते. मात्र चाँगक्विंगमध्ये स्थापत्य अभियंते जमिनीला समांतर गगनचुंबी इमारत बांधत आहेत. ‘हॉरिझॉन्टल स्कायस्क्रॅपर’ पद्धतीचे हे जगातील एकमेवाव्दितीय बांधकाम आहे.या ‘हॉरिझॉन्टल स्कायस्क्रॅपर’ ची लांबी ९८४ फूट असून, ६० मजली उंचीच्या चार इमारतींच्या छतावर हे बांधकाम केले जाणार आहे. जमिनीला समांतर ही आडवी इमारत ९८४ फूट उंचीवर असेल. तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक बांधकाम सुलभ व्हावे यासाठी ते नऊ निरनिराळ््या तुकड्यांमध्ये करून नंतर एकत्र जोडले जाईल. ज्या चार उभ्या इमारतींच्या छतावर आडवे बांधकाम होणार आहे. त्यांच्या प्रत्येकीच्या लांबीएवढे चार भाग वर छतावरच बांधले जातील. चार उभ्या इमारतींत असलेल्या मोकळ््या जागेएवढ्या लांबीचे तीन भाग खाली जमिनीवर बांधून घेऊन ते ६० मजले उंच उचलून वर बांधलेल्या चार भागांना जोडले जातील. दोन्ही टोकांकडचे शेवटचे दोन तुकडे वरच बांधून हे अखंड बांधकाम पूर्ण केले जाईल. दोन इमारतींच्या मधल्या अंतराएवढ्या लांबीच्या बांधकामाचा प्रत्येक तुकडा १,१०० टन वजनाचा असेल. तो छताच्या पातळीपर्यंत उचलून जोडला आहे. हे काम जून अखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.चार इमारतींच्या छतावर आडवे बांधकाम करण्यासाठी काचेचे ३,२०० व अ‍ॅल्युमिनियमचे ४,८०० पॅनल्स वापरले जातील. त्यांचे एकत्र वजन १२ हजार टन म्हणजेच आयफेल टॉवरच्या दीडपट किंवा २० एअरबस ३८० विमानांच्या वजनाएवढे असेल . छतावरील बांधकाम पारदर्शी असेल. त्याचे स्वरूप ‘पॅसेज वे’सारखे असेल. ९८ फूट रुंद आणि ७४ फूट उंचीच्या या ‘पॅसेज-वे’मधून एका टोकाकडून दुसºया टोकापर्यंत जाता येईल. एखाद्यास चक्कर येऊ शकेल एवढ्या उंचीवर दोन स्विमिंग पूल, अनेक उपाहारगृहे व निरीक्षण कट्टे (आॅबझर्व्हेशन डेक) असतील. तेथून चाँगक्विग शहरासह तीन कोटी लोकसंख्येच्या चाओतिआनामिन महानगराचे विहंगम दृश्य आणि यांगत्से व जिआलिंग या दोन नद्यांचा संगमही पाहता येईल. (वृत्तसंस्था) ही आडवी गगनचुंबी इमारत हा ‘रॅफल्स सिटी चाँगक्विंग’ या अतिभव्य बांधकाम प्रकल्पाचा भाग आहे.२.७ अब्ज डॉलर खर्चाचे इमारतींचे संकुल १७० फूटबॉल मैदानांएवढ्या जमिनीवर उभारले जात आहे.या संकुलात आठ उभ्या व एक आडवी, जमिनीला समांतर गगनचुंबी इमारती असतील. सहा उभ्या इमारती प्रत्येकी ८२० फूट तर दोन प्रत्येकी १,१४८ फूट उंचीच्या असतील.

टॅग्स :chinaचीन