शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पाकने सोडले लखवीला पुन्हा मोकाट

By admin | Updated: April 11, 2015 00:52 IST

लष्कर-ए-तोयबाचा कमांडर व मुंबईवरील २००८ च्या हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रेहमान लखवी याची पाकिस्तानी तुरुंगातून मुक्तता करण्यात आली आहे.

लाहोर : लष्कर-ए-तोयबाचा कमांडर व मुंबईवरील २००८ च्या हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रेहमान लखवी याची पाकिस्तानी तुरुंगातून मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईवरील २६-११ च्या हल्ल्यात लष्कर ए तोयबाच्या १० दहशतवाद्यांना कंट्रोल रुममधून सूचना देण्याचे काम लखवीने केले होते. मुंबईला ६० तासांचा वेढा घालणाऱ्या लखवीला रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगातून मुक्त करण्यात आले. लाहोर उच्च न्यायालयाने गुरुवारी त्याची शिक्षा रद्द करून त्याला तात्काळ सोडण्याचा आदेश दिला होता. लखवीच्या विधि पथकातील एका सदस्याने न्यायालयाचा आदेश तुरुंगापर्यंत पोहोचवला. त्यानंतर दुपारी १.४० वाजता लखवीला सोडण्यात आले. भारताने लखवीच्या मुक्ततेला जोरदार आक्षेप घेतला असून, पाकिस्तानने दहशतवादाचा बीमोड करण्याचे दिलेले आश्वासन मोडले आहे, असा आरोप भारताने केला आहे. ५५ वर्षांचा लखवी तुरुंगातून बाहेर पडला तेव्हा त्याचे स्वागत करण्यासाठी जमात उद दवाचे समर्थक तुरुंगाबाहेर जमले होते. समर्थकांच्या चार ते पाच कार अदियाला तुरुंगाबाहेर दुपारी १ च्या आसपास उभ्या होत्या. लखवी तुरुंगातून बाहेर आला, एका कारमध्ये बसला व इस्लामाबाद येथील आपल्या घराकडे निघून गेला.लखवीचा वकील राजा रिझवान अब्बासी याने दिलेल्या माहितीनुसार पाक सरकारला लखवीला सोडण्याखेरीज अन्य पर्याय राहिला नव्हता. (वृत्तसंस्था)