शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

उ. कोरियाची तीन क्षेपणास्त्रांची चाचणी

By admin | Updated: July 20, 2016 05:37 IST

उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय दबाव झुगारून मंगळवारी पुन्हा तीन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली

सेऊल : उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय दबाव झुगारून मंगळवारी पुन्हा तीन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. या क्षेपणास्त्रांनी ५०० ते ६०० कि.मी. एवढे अंतर पार केले. ही क्षेपणास्त्रे दक्षिण कोरियात कुठेही हल्ला करण्यास सक्षम आहेत. दरम्यान, उ. कोरियाने पुन्हा चिथावणीखोर कृत्य केल्याची टीका दक्षिण कोरियाने चाचणीनंतर केली. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने क्षेपणास्त्र विरोधीप्रणाली बसविण्याची घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर कोरियाने हे पाऊल उचलले. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड विरोध असूनही उ. कोरियाने क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. आजच्या चाचणीस सकाळी ५.४५ वाजता प्रारंभ झाला. ५५ मिनिटांत तिन्ही क्षेपणास्त्रांची चाचणी पूर्ण झाली. या क्षेपणास्त्रांनी ५०० ते ६०० कि.मी. एवढे अंतर पार केले. उत्तर कोरियाने घेतलेल्या तीन क्षेपणास्त्रांच्या चाचणीचाआपण तासाभरात छडा लावला, असा दावा अमेरिकी लष्कराने केला. उ. कोरियाने ज्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. त्यातील दोन स्कड, तर एक रोडोंग क्षेपणास्त्र असण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)कॅलिफोर्नियातील मिडिलबरी इंटरनॅशनल स्टडीजचे वरिष्ठ संशोधक मेलिस्सा हनहाम यांनी ही क्षेपणास्त्र चाचणी तांत्रिक नाही, तर राजकीय असल्याचे सांगितले. उत्तर कोरियाचा सहकारी समजल्या जाणाऱ्या चीनने या चाचणीवर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तथापि, जपानने उत्तर कोरियाची ही चाचणी सुरक्षा परिषदेच्या ठरावाचे उल्लंघन असून, या भागातून जाणाऱ्या विमानांसाठी ही अत्यंत धोकादायक बाब असल्याचे म्हटले आहे.