शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

फ्रँकफर्टमधील कट्टेकर म्हणतात, आम्ही ठीक आहोत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:30 IST

जर्मनीत चालवतात मराठी कट्टा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समुपदेशनाचा आधार

राजू इनामदार ।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘भेटणे, बसणे, गप्पा मारणे आणि संघटना स्थापन करणे’ याची जन्मत:च ओढ असणाऱ्या मराठी बांधवांनी जर्मनीतही (फ्रँकफर्ट) ही आवड जपली आहे. कोरोना विषाणूच्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर ‘मराठी कट्टा’च्या माध्यमातून तब्बल साडेचार हजार मराठी ‘जन’ फेसबुक पेजचा वापर करत परस्परांचा आधार झाले आहेत.‘मराठी कट्टा, जर्मनी’ ही फ्रँकफर्ट आणि परिसरातल्या साडेतीन-चार हजार मराठी लोकांना अगदी आपली वाटणारी संघटना. अजित रानडे आणि त्याच्या मित्रमंडळींनी मराठी लोकांचे सांस्कृतिक कार्यक्रम करावेत, त्यांना एकत्र आणावं आणि त्यांच्यासाठी अडीअडचणीला उपयोगी पडणारा एखादा ग्रुप असावा म्हणून काही वर्षांपूर्वी हा कट्टा सुरू केला. गेली काही वर्षे जर्मनीत असलेले या कट्ट्याचे सदस्य हृषीकेश कुलकर्णी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘‘सध्याच्या काळात अजित ने आपल्या ‘देसी जर्मन्स’ या खाजगी कंपनीची सर्व संसाधनं मराठी कट्ट्याच्या बरोबरीने मराठी / भारतीय लोकांना मदत करण्यासाठी झोकून दिली आहेत. जीवन करपे, अक्षय जोशी, मोहिनी काळे, सागर तिडमे, जान्हवी देशमुख, डॉ. मेघा जाधव, इंद्रनील पोळ अशी आणि इतरही अनेक उत्साही तरुण मंडळी त्याच्या बरोबरीने मैदानात उतरून गरजू लोकांना मार्गदर्शन, समुपदेशन आणि मदत करीत आहेत.’’कुलकर्णी म्हणाले, ‘‘याशिवाय आणखी काही गोष्टी इथे मराठीपणातून सुरू झाल्या आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे आॅफीस सुटल्यावर (म्हणजे घरात कॉम्प्युटर बंद केल्यावर) करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आपल्या भारताच्या कॉन्सुलेट (फ्रँकफर्ट)च्या फेसबुक पेजवर जायचं. तिथे रोज ‘कनेक्ट लाईव्ह विथ सीजीआय’ नावाच्या कार्यक्रमात काहीतरी गंमत असतेच. कधी कोणी येऊन गोष्ट सांगतात, कधी कोणी नृत्य शिकवतात, कधी तज्ज्ञांचे सल्ले, तर कधी एखादी प्रश्नमंजूषा. भाग घ्यायला काही हजार भारतीय (आणि जर्मनसुद्धा) व्हर्चुअली एकत्र येतात. कॉन्सुल जनरल प्रतिभा पारकर यांनी सुरू केलेल्या या उपक्रमावर भारतीय एकदम खूष आहेत.’’ एकमेकांना भेटून प्रसन्न होणार नाही तो भारतीय कसला? असा प्रश्न करून कुलकर्णी म्हणाले, ‘‘कॉन्सुलेटच्या वेबसाईटवर कोरोनाबद्दल माहिती मिळतेच; परंतु या परिसरातल्या अनेक भारतीय संस्था, मंडळे, विद्यार्थी संघटना यांचीही संपर्क माहिती एकाच ठिकाणी मिळते. जर्मनीत तशी स्थिती खूपच बरी आहे. कोणी खरंच कोरोनाने आजारी पडला, तर त्याला उत्तम वैद्यकीय मदत लगेच मिळण्याची व्यवस्था आहेच. ज्यांना कोरोना झालेला नाही; परंतु इथे एकटे पडल्यामुळे भीती वाटतेय, काळजी वाटतेय, काही सुचत नाहीये, काही सल्ला हवाय, इतर काही अडचणी आहेत, असे लोक यातल्या कुठल्या ना कुठल्या संघटनेकडे हक्काने जातात.’’कुलकर्णी म्हणाले, ‘‘लोकांना कधीकधी शंका येतात, कधीकधी स्वत:लाच कोरोना झालाय की काय, असं वाटायला लागतं. परदेशात एकटं राहणं व तेही या परिस्थितीत आव्हानात्मकच आहे. कोणाकडे आलेल्या ज्येष्ठ आईृ-वडिलांचा व्हिसा संपलेला असतो; पण विमानसेवा बंद असल्याने ते परत जाऊ शकत नसतात. कोणाच्या पाहुण्यांनी भारतातून आणलेली औषधं संपलेली असतात आणि ती इथे कशी मिळवायची ते माहीत नसतं. जॉब सीकर व्हिसावर आलेल्यांचे प्रश्न आणखी वेगळे. हातात नोकरी नसताना, ती मिळवण्यासाठी म्हणून आलेले धाडसी लोक असतात ते. त्यातले नोकरी अद्याप न मिळालेले, कोणी इंटर्नशिप करायला आलेले तर कोणी नुसतेच टूरिस्ट. या सगळ्यांच्या समोर व्हिसा संपल्यावरइथे अडकून पडायची वेळ आलेली आहे. अशा सर्वांना धीर द्यायचा, योग्य माहिती त्यांना द्यायची, योग्य ती सरकारी आॅफिसं, मदतगार संस्थांशी त्यांना जोडून द्यायचं अशी कामं ही मराठी कट्टेकर मंडळी अतिशय उत्साहानं करीत आहेत.’’एकूणच मराठी आणि भारतीय लोकांनी या परिस्थितीत धीर न सोडता एकमेकांना मदत करीत सकारात्मक राहायचं ठरवलं आहे, हे स्पष्ट दिसतंय. भारतातल्या आमच्या कुटुंबीयांना आणि मित्रमंडळींना, ‘आम्ही ठीक आहोत, काळजी घेतोय, तुम्हीही घेत राहा, लवकरच भेटू’ असं नक्की सांगायचंय. अन्य माध्यमांबरोबरच ‘लोकमत’च्या माध्यमातून ते सांगा येत आहे याचा आनंद आहे, असे हृषीकेश कुलकर्णी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या