शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

केटी पेरीनं इन्स्टाग्रामवर टाकला "काली" मातेचा फोटो, भारतीयांना राग अनावर

By admin | Updated: April 20, 2017 13:59 IST

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार केटी पेरीनं इन्स्टाग्राम एक फोटो शेअर करून वाद ओढावून घेतला आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 20 - गेल्या दोन दिवसांपूर्वीच सोनू निगमचा अजानवरच्या ट्विटचा वाद कायम असतानाच आता आंतरराष्ट्रीय पॉप स्टार केटी पेरीनं इन्स्टाग्राम एक फोटो शेअर करून वाद ओढावून घेतला आहे. केटीनं बुधवारी इन्स्टाग्राम प्रोफाइलवर वाईट शक्तींची नायनाट करणारी काली मातेचा फोटो शेअर केला होता आणि फोटोच्या खाली करंट मूड (current mood) असं लिहिलेलं होतं. भारतीय यूजर्सना केटी पेरीचं हे कृत्य अजिबात न रुचल्यानं त्यांनी केटी पेरीला इन्स्टाग्रामवरच खडे बोल सुनावले आहेत. या वादग्रस्त ट्विटमुळे केटी पेरीला अनेक भारतीय यूजर्सनी लक्ष्य केलं आहे. एका यूजर्सनं भारतीय देवतांचा अपमान करू नका, याला मूड म्हणता येणार नाही. काही तरी मूल्ये बाळगा आणि लवकरात लवकर हा फोटो तुमच्या प्रोफाइलवरून काढून टाका, असं म्हटलं आहे. तर दुस-या एका युजर्सनं टीकात्मक प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे की, कोणत्याही धार्मिक फोटोचा उपयोग स्वतःचा मूड दाखवण्यासाठी करणं योग्य नाही. मात्र केटी पेरीच्या समर्थनार्थही काही लोक पुढे सरसावले आहेत. तसेच केटी पेरीला हे प्रकरण गांभीर्यानं न घेण्याचाही अनेक युझर्सनी सल्ला दिला आहे. केटी पेरीचे नाव हे भारतीयांसाठी काही नवीन नाही. 2010मध्ये केटी पेरीनं राजस्थानमध्ये रसेल ब्रांड याच्याशी हिंदू परंपरेनुसार लग्न केलं होतं. मात्र काही दिवसांनंतर दोघांमध्ये घटस्फोटही झाला. जागतिक स्तरावर केटी पेरीला हॉट स्टार म्हणून ओळखलं जातं. केटी पेरीचा भारतातही लाखोंच्या संख्येत मोठा चाहतावर्ग आहे.

{{{{instagram_id####"https://www.instagram.com/p/BTDJ-gkD2HC/"}}}}