शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कायमच मोडला अर्ध्यावर डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 04:08 IST

‘पंजाब का शेर’ अशी ज्यांची ओळख आहे ते नवाज शरीफ तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले; पण दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत.

इस्लामाबाद : ‘पंजाब का शेर’ अशी ज्यांची ओळख आहे ते नवाज शरीफ तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले; पण दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. कधी राष्ट्रपती कार्यालयामुळे, तर कधी लष्कराच्या उठावामुळे आणि आता न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांच्या हातून सत्ता गेली.पाकिस्तानच्या राजकारणातील मोठे प्रस्थ आणि राजकारणातील एक मोठे कुटुंब म्हणून नवाज शरीफ यांच्याकडे बघितले जाते. जून २०१३ मध्ये ते तिसºयांदा पंतप्रधान झाले. या काळात अनेक अडचणीही आल्या; पण पनामागेट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरविले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने पाकिस्तान एका राजकीय संकटात सापडला आहे. अर्थव्यवस्थेसमोरील अडचणी आणि वाढता दहशतवाद यांचे आव्हान समोर असतानाच देशात राजकीय संकट उभे ठाकले आहे. एक सक्षम नेते म्हणून ओळख असलेले शरीफ पनामा प्रकरणात मात्र स्वत:च समस्यांमध्ये अडकले. शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर विदेशात अवैध संपत्ती घेणे, ब्रिटिश आयलँडमध्ये कंपनी सुरू केल्याचा आरोप होता. याबाबत राष्ट्राला उद्देशून भाषण करताना शरीफ यांनी आपल्या कुटुंबाच्या व्यवसायाचा उल्लेख केला होता. आपल्या दिवंगत वडिलांनी व्यवसायाची उभारणी केली होती. लंडन आणि अन्य ठिकाणी खरेदी केलेल्या संपत्तीचा हा व्यवसायच स्रोत असल्याचे त्यांनी सांगितले होते.पोलिसांची भूमिका पक्षपातीजेआयटीने १० जुलै रोजी आपला अहवाल न्यायालयाला सोपविला होता आणि शरीफ यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे नवे प्रकरण दाखल करण्याची शिफारस केली होती. हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत शरीफ यांनी तेव्हा राजीनामा देण्यास नकार दिला होता. २०१३ च्या निवडणुकीत शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग (पीएमएल-एन) हा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. शरीफ यांचा जन्म १९४९ मध्ये लाहोरमध्ये एका श्रीमंत कुटुंबात झाला. इंग्रजी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यांनी वडिलांच्या स्टील कंपनीत काम सुरू केले. त्यानंतर शरीफ यांनी राजकारणात प्रवेश केला. अगोदर अर्थमंत्री आणि नंतर ते पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री झाले. १९९० मध्ये ते पंतप्रधान झाले आणि त्यानंतर आता तिसºयांदा पंतप्रधान झाले होते. मात्र, पनामा प्रकरणाने ते हा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत.