शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकी ड्रोन हल्ल्यात ‘जिहादी जॉन’ ठार?

By admin | Updated: November 14, 2015 01:24 IST

सिरियात ओलिस नागरिकांचे ‘निर्घृण शिरकाण’ करणारा आणि दहशत पसरविण्यासाठी तशी चित्रफीत प्रसारित करणारा कुख्यात ब्रिटिश ‘इसिस’ अतिरेकी मोहम्मद एमवाझी ऊर्फ ‘जिहादी जॉन’

लंडन : सिरियात ओलिस नागरिकांचे ‘निर्घृण शिरकाण’ करणारा आणि दहशत पसरविण्यासाठी तशी चित्रफीत प्रसारित करणारा कुख्यात ब्रिटिश ‘इसिस’ अतिरेकी मोहम्मद एमवाझी ऊर्फ ‘जिहादी जॉन’ हा अमेरिकी ड्रोन हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे. स्वयंसंरक्षणासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे ब्रिटीश पंतप्रधानांनी सांंगितले असले तरी त्यांनी तो मारला गेला की नाही यावर ठोस भाष्य केले नाही. खरोखरच ‘जिहादी जॉन’ मारला गेला काय, याची खातरजमा अमेरिका करीत आहे; पण ब्रिटिश पंतप्रधान कॅमरून यांच्या १० डाऊनिंग स्ट्रीट या कार्यालयाने तो मारला गेल्याची प्रबळ शक्यता वर्तविली आहे. ‘जिहादी जॉन’ मारला गेल्याची ९९ टक्के खात्री अमेरिकी लष्कराला वाटते. ब्रिटिश या अभियानात अमेरिकी लष्कराच्या समन्वयाने काम करीत असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. या कारवाईचा तपशील देताना पेंटॅगॉनचे प्रेस सचिव पीटर कुक म्हणाले की, अमेरिकी लष्कराने १२ नोव्हेंबर २०१५ रोजी मोहम्मद एमवाझी याला ‘लक्ष्य’ करून सिरियातील रक्का येथे हवाई हल्ला केला. त्यात तो मारला गेल्याची आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाली आहे.इंग्रजी बोलणारा एमवाझी याचा जन्म कथितरीत्या कुवैतमध्ये झाला होता. त्यातले अमेरिकी पत्रकार स्टीवन सोरलोफ आणि जेम्स फोले, अमेरिकी साहायता कर्मचारी अब्दुल रहमान कासिंग, ब्रिटिश साहायता कर्मचारी डेव्हिड हेन्स आणि जपानी पत्रकार केंजी गोटो, तसेच अन्य काही ओलिसांच्या हत्या केल्याचा संशय आहे.