शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘जिहादी जॉन’ ब्रिटिश आयटी पदवीधारक

By admin | Updated: February 26, 2015 23:49 IST

इस्लामिक स्टेटच्या थरकाप उडविणाऱ्या शिरच्छेदांच्या व्हिडिओत दिसणारा आणि जिहादी जॉन म्हणून ओळखला जाणारा धष्टपुष्ट जल्लाद हा कुवैत वंशाचा ब्रिटिश नागरिक आहे.

लंडन : इस्लामिक स्टेटच्या थरकाप उडविणा-या शिरच्छेदांच्या व्हिडिओत दिसणारा आणि जिहादी जॉन म्हणून ओळखला जाणारा धष्टपुष्ट जल्लाद हा कुवैत वंशाचा ब्रिटिश नागरिक आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तात ही खळबळजनक माहिती दिली आहे. मोहंमद इमवाझी असे या २५ वर्षीय क्रूरकर्म्याचे नाव असून पाश्चात्त्य ओलिसांच्या हत्येच्या अनेक व्हिडिओत तो दिसतो. यापैकी काही ओलिसांना त्याने स्वत: ठार केले आहे. इमवाझीकडे कॉम्प्युटर प्रोग्रामिंगची पदवी आहे. ब्रिटनच्या सुरक्षा सेवेला त्याच्याबद्दल माहिती होती; मात्र कारवाईच्या कारणांमुळे त्याची ओळख यापूर्वी उघड करण्यात आली नव्हती. गेल्या वर्षी हेनिंग याची हत्या करण्यात आल्यानंतर पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी या क्रूरकर्म्याची शोधमोहीम तीव्र केली. इमवाझी हा ब्रिटिश नागरिक आहे. तो एका सधन कुटुंबाचा सदस्य असून लंडनमध्ये लहानाचा मोठा झाला आहे, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.