शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी अफगाणहून येणार जिहादी

By admin | Updated: June 15, 2014 12:47 IST

काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी अफगाणिस्तानहून जिहादींचे एक पथक भारतात येणार आहे असा चिथावणीखोर इशारा अलकायदाने दिला आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १५- काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी अफगाणिस्तानहून जिहादींचे एक पथक भारतात येणार आहे असा चिथावणीखोर इशारा अलकायदाने दिला आहे. भारतातील मुसलमानांनी सिरीया आणि इराकमधील मुसलमानांप्रमाणेच भारताविरुद्ध जिहाद पुकारावे असे आवाहनही अल कायदाने केले आहे.
अलकायदाच्या पाकिस्तान सेलचा वरिष्ठ नेता मौलाना आसीम उमर याने एक व्हिडीओ जाहीर केला असून 'द वॉर कंटीन्यू: अ स्टेटमेंट ऑन काश्मीर्स मुस्लीम' असे या व्हिडीओचे नाव आहे. यात उमरने भारताविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. उमर म्हणतो, काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी अफगाणहून जिहादी येणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात उमरने काश्मीरसह संपूर्ण भारत व पाकिस्तानमधील नागरिकांनी जिहाद पुकारावे असे आवाहनही केले आहे.
या चिथावणीखोर व्हिडीओत श्रीनगरमध्ये २०१० मध्ये भारतीय सुरक्षा दल आणि काश्मीरमधील सर्वसामान्य नागरिकांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे दृष्यही दाखवण्यात आले आहे. 'आज संपूर्ण जगात मुसलमानांनी हत्यार हाती घेतले असून ते जिहादमध्ये सामील होत आहेत. जे मुस्लीम बांधव शांतीपूर्ण मार्गाने जिहादसाठी लढत होते तेदेखील आता निराश झाल्याने सशस्त्र लढ्यासाठी सज्ज झाले आहेत असे या व्हिडीओत म्हटले आहे. कट्टर इस्लामी देश म्हणून ओळखले जाणारे सिरीया, इराक, अल्झेरिया आणि अन्य देशांचे दाखले या व्हिडीओत देण्यात आले आहे. 
सिरीया बनतोय दहशतवाद्यांचे केंद्र
अफगाणिस्तानऐवजी सिरीया दहशतवाद्यांचे केंद्र बनल्याचे या व्हिडीओत म्हटले असून आता त्यांचे पुढील लक्ष्य काश्मीर असल्याचा दावाही करण्यात आला आहे. यापूर्वीही युरोप व रशिया या देशांनी यापूर्वीही सिरीयामधील विरोधी गटाला कट्टर इस्लामी धडे दिले जात असल्याचा इशारा दिला होता. सिरीयातील जबहत अल नसरा या संघटनेचे अल कायदाशी थेट संबंध असल्याचा गौप्यस्फोटही रशियाने केला होता. या व्हिडीओत अल कायदाने युरोपमध्येही हल्ल्याची धमकी दिली आहे.