टोकियो : मिरेई इकुता या जपानच्या ६ वर्षीय मुलीच्या मृतदेहाचे तुकडे तिच्याच घराजवळ अनेक प्लास्टिक बॅगांमध्ये आढळल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले. मिरेई इकुता ही पश्चिम जपानमधील कोबे शहरातून ११ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाली होती. तत्पूर्वी या तुकड्यांची डीएनए चाचणी केल्यानंतर ते मिरेई इकुताचेच असल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी पोलीस अधिकारी तिच्या घराशेजारी राहणाऱ्या ४७ वर्षांच्या व्यक्तीची चौकशी करीत आहेत. जगात सगळ््यात कमी गुन्हेगारी जपानमध्ये असून हिंसक घटनाही तेथे तुलनेने क्वचितच होतात. दोन आठवड्यांपूर्वी मिरेई शाळेतून घरी परत आली नाही म्हणून तिचा कसून शोध सुरू झाला होता. (वृत्तसंस्था)
जपानमध्ये मुलीच्या मृतदेहाचे तुकडे अनेक बॅग्जमध्ये
By admin | Updated: September 25, 2014 03:03 IST