शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलचे माजी पंतप्रधान ओलमर्ट यांना सहा वर्षांची शिक्षा

By admin | Updated: May 14, 2014 03:14 IST

इस्रायलचे माजी पंतप्रधान एहुद ओलमर्ट यांना रिअल इस्टेटच्या एका प्रकरणात सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, इस्रायलच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानपदासारखे वरिष्ठ पद भूषविलेल्या नेत्याला अशी शिक्षा झाली आहे.

तेल अवीव- इस्रायलचे माजी पंतप्रधान एहुद ओलमर्ट यांना रिअल इस्टेटच्या एका प्रकरणात सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, इस्रायलच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानपदासारखे वरिष्ठ पद भूषविलेल्या नेत्याला अशी शिक्षा झाली आहे. बदनाम माजी पंतप्रधान ओलमर्ट यांना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. शिक्षा झालेल्या प्रकरणात होली लँड नावाच्या जागेसंदर्भात भ्रष्टाचार झाला आहे. ओलमर्ट यांना ३० हजार डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे.न्या. डेव्हिड रोसन यांनी ६८ वर्षांचे ओलमर्ट यांना मार्चच्या अखेरीस भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणात दोषी ठरविले होते. जेरुसलेम येथील होलीलँड प्रॉजेक्टच्या विकासकाकडून, ओलमर्ट यांनी जेरुसलेमचा मेयर म्हणून काम करताना १ लाख ६० हजार डॉलर घेतल्याचा आरोप आहे. जे लाच देतात ते भ्रष्ट असतात; पण जे स्वीकारतात ते देशाची प्रतिष्ठा डागाळतात व जनतेचा प्रशासनावरील विश्वास कमी करतात. जनतेचा सेवक जर लाच स्वीकारत असेल तर तो देशद्रोही ठरतो, असे न्या. रोसन यांनी निकाल जाहीर करताना म्हटले आहे. या प्रकरणात सात जणांना शिक्षा सुनावण्यात आल्या असून, त्या १ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, दंड दहा हप्त्यांत द्यायचा आहे. ओलमर्ट यांनी त्यांच्यावरील आरोप नाकारले आहेत.