शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 11:50 IST

लेबनॉनच्या दक्षिणेकडील उपनगरात मंगळवारी सकाळी अनेक हल्ले सुरू झाल्याने बेरूतमध्ये धुराचे लोट पसरले.

बेरूत/जेरुसलेम: इस्रायलच्या लष्कराने बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरांवर मोठा हवाई हल्ला केला आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ताब्यातील प्रदेशावरील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. इस्रायली सैन्याने लेबनॉनच्या मध्यवर्ती भागावर हा हल्ला केला, ज्यात २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनच्या दक्षिणेकडील उपनगरात मंगळवारी सकाळी अनेक हल्ले सुरू झाल्याने बेरूतमध्ये धुराचे लोट पसरले.

सोशल मीडियावर नागरिकांना चेतावणी दिल्यानंतर, इस्रायली लष्कराने सांगितले की, बेरूतच्या दहियाह भागात हिजबुल्लाच्या स्थानांवर हल्ला केला. तसेच, हिजबुल्लाह संघटनेची बहुतेक शस्त्रे आणि क्षेपणास्त्र सुविधा नष्ट केल्या. पुढे इस्रायलने म्हटले की, नागरिकांचे नुकसान कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. तसेच, मानवी ढाल म्हणून रहिवाशांचा वापर करण्यासाठी हिजबुल्लाहने मुद्दाम नागरी भागात प्रवेश केल्याच्या मागील आरोपाचा पुनरुच्चार इस्रायली लष्कराने केला. मात्र, हिजबुल्लाहने हा आरोप फेटाळून लावला आहे.

हिजबुल्लाहनेही इस्रायलला दिले प्रत्युत्तरउत्तर इस्रायलमधील नाहारिया शहरातील निवासी इमारतीवर झालेल्या हल्ल्यात दोन जण ठार झाले, असे इस्रायली पोलिसांनी सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी हिजबुल्लाहने स्वीकारली आणि सांगितले की, नंतर ड्रोन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि म्हटले की, त्यांचे लक्ष्य नहारियाच्या पूर्वेला असलेल्या लष्करी तळावर होते. दरम्यान, उत्तरेकडील ड्रोन हल्ल्यांमुळे इस्रायलींना आश्रय घ्यावा लागला आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

लेबनॉनचे मोठे नुकसानइस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनचे मोठे नुकसान झाले आहे. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशाच्या मध्यभागी असलेल्या माउंट प्रांतात इस्रायली हल्ल्यात बेरूतच्या आग्नेयेकडील बाल्चमे गावात आठ आणि चौफ जिल्ह्यातील जौन गावात १५ लोक ठार झाले. दक्षिणेत, तेफाहता येथे इस्रायली हल्ल्यात पाच, नाबतीहवरील हल्ल्यात दोन आणि तटीय या किनारपट्टीवरील शहरामध्ये एक जण ठार झाला.याशिवाय, ईशान्येकडील हर्मेल येथे झालेल्या हल्ल्यात आणखी एकाचा मृत्यू झाला, असे मंत्रालयाने सांगितले.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIsraelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष