शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

इस्रायली सैन्याने शेकडो मगरींना गोळ्या घालून मारले; कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:26 IST

Israel News: पर्यावरणवाद्यांनी इस्रायलच्या या कृतीवर तीव्र शब्दात टीका केली.

Israel News: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सैन्याने वेस्ट बँक भागात २६२ मगरींना गोळ्या घालून मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पर्यावरणवाद्यांनी इस्रायलच्या या कृतीवर तीव्र शब्दात टीका केली. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायली सैन्याने व्यापलेल्या वेस्ट बँकमधील बेकायदेशीर वस्ती असलेल्या पेटझेलजवळील एका क्रोकोडायल फार्ममध्ये २६२ मगरींना गोळ्या घालून मारले. सैन्याने आधी तलावाचे पाणी काढून टाकले, नंतर शेकडो मगरींना गोळ्या घातल्या. हा परिसर एकेकाळी लोकप्रिय पर्यटन स्थळ होते. येथे मगरींच्या कातड्याचा व्यवसायदेखील व्हायचा. २००० च्या दशकात येथे सुमारे ३,००० मगरी आणण्यात आल्या होत्या.

हत्येमागील कारण काय आहे?इस्रायली सैन्याचे म्हणणे आहे की, या फार्मची योग्य देखभाल केली जात नव्हती, त्यामुळे मगरी स्थानिक नागरिकांसाठी धोकादायक ठरत होत्या. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मगरी वाईट परिस्थितीत राहत आहेत. अन्नाअभावी त्या एकमेकांवरही हल्ला करतात. २०१३ पासून इस्रायलमध्ये नाईल मगरींना संरक्षित प्रजाती म्हणून घोषित करण्यात आले आहे. तरीदेखील सैन्याने या मगरींना गोळ्या घालून ठार मारले. 

फार्म मालकाचा सैन्यावर आरोप  फार्मचा मालक बिटनने या परिसराला संरक्षण देण्यास नकार दिला होता. २०१३ मध्ये नाईल मगरीला संरक्षित प्रजाती म्हणून घोषित करण्यापूर्वी बिटन पैशासाठी मगरींचा व्यापार करायचा. मात्र, कायदा बदलल्यानंतर बिटनचा पैसे कमावण्याचा मार्ग बंद झाला. तेव्हापासून त्याने मगरींकडे दुर्लक्ष सुरू केले. स्थानिक प्रशासनाने मदत न केल्याचा दावा बिटनने केला आहे. तो म्हणतो की, मगरींना इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र त्यापूर्वीच प्रशासनाने शेतात घुसून मगरींना मारले.

टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू