शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 06:48 IST

हमासला संघर्ष रोखायचा नसल्यास त्या संघटनेचा नायनाट करणार : ट्रम्प

वॉशिंग्टन डीसी : गाझामधील संघर्ष संपविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २० कलमी योजना मांडली आहे. हे युद्ध थांबविण्याची व शस्त्रसंधी करण्याची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी तयारी दर्शविली आहे. यासंदर्भात नेतान्याहू यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी इशारा दिला की युद्ध रोखण्याची तयारी हमासने दाखविली नाही, तर त्यांचा कायमचा नायनाट करण्यात येईल.

नेतान्याहू यांनी ट्रम्प यांची अमेरिकेत सोमवारी रात्री भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत गाझा संघर्ष संपविण्याबद्दलच्या २० कलमी योजनेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी ट्रम्प म्हणाले की, हमासने ही योजना मान्य केली नाही, तर त्या संघटनेचा नायनाट करण्याचा इस्रायलला संपूर्ण अधिकार आहे. त्यावेळी अमेरिका इस्रायलसोबत असेल. मी सूचविलेल्या योजनेला पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ व त्या देशाचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी शंभर टक्के पाठिंबा दिला आहे, असा खास उल्लेख ट्रम्प यांनी केला.

ट्रम्प यांनी सादर केलेली योजना पॅलेस्टिनी व इस्रायली जनतेसह पश्चिम आशियातील लोकांसाठी दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि विकासाचा योग्य मार्ग दाखविते, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली.

युद्ध थांबविण्याच्या प्रस्तावावर हमासचा विचार सुरू

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील युद्ध संपविण्यासाठी तयार केलेल्या २० कलमी योजनेचा प्रस्ताव हमासला सादर करण्यात आला आहे. आम्ही या योजनेवर विचार करत आहोत असे हमासने म्हटले आहे. कोणताही अंतिम तोडगा मान्य होईपर्यंत आम्ही शस्त्रे खाली ठेवणार नाही, असेही या संघटनेने म्हटले आहे.

संघर्ष संपविण्यासाठी २० कलमी योजना खालीलप्रमाणे...

(१) इस्रायल आणि हमास दोघांनी मान्य केले, तर युद्ध तत्काळ थांबवले जाईल.(२) हमासशी करार झाला, तर इस्रायल आपले सैन्य मागे घेईल.(३) हमास ओलिस असलेले इस्रायली नागरिक किंवा त्यांचे मृतदेह ७२ तासांमध्ये इस्रायलकडे सोपवेल.(४) शिक्षा भोगणारे २५० पॅलेस्टिनी नागरिक, गाझातील १७०० नागरिकांची इस्रायल कैदेतून मुक्तता करेल.(५) प्रत्येक इस्रायली सैनिकाच्या मृतदेहाच्या बदल्यात १५ पॅलेस्टिनी नागरिकांचे मृतदेह परत केले जातील.(६) हमासचे सर्व तळ आणि शस्त्रसाठा नष्ट केला जाईल.(७) हमासचा प्रशासनात सहभाग नसेल.(८) गाझाचा कारभार चालविण्यासाठी एक तात्पुरती प्रशासन समिती.(९) शांतता मंडळ स्थापन केले जाईल -या मंडळाच्या अध्यक्षपदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः असतील.(१०) शांतता मंडळ गाझाच्या विकासाबद्दलचे नियोजन करेल, आर्थिक भार उचलेल.(११) गाझामध्ये मदत तातडीने पुरविण्यासाठी मनुष्यबळ दिले जाईल.(१२) रोजगार वाढवण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्र तयार केले जाईल.(१३) कोणालाही गाझा सोडण्यास भाग पाडले जाणार नाही. परतीचा मार्ग खुला.(१४) शांतता राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा दल तैनात केले जाईल.(१५) पोलिस दलाला प्रशिक्षण देईल.(१६) इस्रायल आणि इजिप्तच्या सीमांवरील सुरक्षा बळकट केली जाईल.(१७) हवाई तसेच तोफखोन्याद्वारे होणारे हल्ले थांबवले जातील.(१८) मानवी हक्कांचे रक्षण करण्यास आंतरराष्ट्रीय संस्था मदत करतील.(१९) शांततेसाठी नेतृत्वात थेट चर्चा.(२०) गाझामध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण करणार. विकास आणि चांगले जीवनमान निर्माण करणार.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's 20-Point Gaza Plan Accepted by Israel to End War

Web Summary : President Trump proposed a 20-point plan to end the Gaza conflict, accepted by Israel. The plan includes a ceasefire, prisoner exchange, Hamas disarmament, and Gaza reconstruction overseen by a US-led peace council. Hamas is considering the proposal, while Pakistan and PM Modi have expressed support.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIsraelइस्रायल