शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

इस्लामिक स्टेटकडून २१ जणांचा शिरच्छेद

By admin | Updated: February 17, 2015 02:38 IST

इसिस वा इस्लामिक स्टेटस्ने आपल्या क्रौर्याची परिसीमा गाठत नवी चित्रफीत प्रसिद्ध केली

कैरो : इसिस वा इस्लामिक स्टेटस्ने आपल्या क्रौर्याची परिसीमा गाठत नवी चित्रफीत प्रसिद्ध केली असून, या चित्रफितीत लिबियाच्या किनारपट्टीवर इजिप्तमधील ख्रिश्चन समाजाच्या २१ नागरिकांचे सामूहिक हत्याकांड दाखविले आहे. ओलिस असणारे २१ इजिप्शियन नागरिक केशरी पोशाखात हात मागे बांधून उभे आहेत व हल्लेखोर त्यांचे शिरकाण करत आहे.ही चित्रफित प्रसिद्ध झाल्यानंतर इजिप्तने लिबिया या शेजारी देशाावर तत्काळ हवाई हल्ले सुरु केले असून, इजिप्तने वाढत्या दहशतवादाविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. ही चित्रफित पाच मिनिटाची असून, लिबियाची राजधानी त्रिपोलीजवळील एका किनारपट्टीवर हे हत्याकांड घडत असताना दिसत आहे.या चित्रफितीमुळे इसिस पुन्हा क्रूर हत्याकांडाकडे वळताना दिसत आहे. या हल्ल्यातील एका दहशतवाद्याने रोमवर विजय मिळवू असा इशारा दिला आहे. या चित्रफितीनंतर इजिप्तमध्ये सात दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला आहे. या चित्रफितीची भीषणता पाहिल्यानंतर प्रथमच इजिप्तने लिबियाविरोधात लष्करी कारवाईची जाहीर घोषणा केली आहे.ओसामा बिन लादेनच्या शरीरात जे रक्त खेळत होते, तेच रक्त आता तुमच्या रक्तात मिसळणार आहे असे एक दहशतवादी बोलताना दिसत आहे. या नागरिकांचे गेल्या महिन्यात लिबियातून अपहरण झाले होते. नागरिकांची हत्या करून इसिसच्या जिहादींनी इजिप्तचे रक्त सांडले आहे. त्यामुळे त्याचा सूड घेणे भाग आहे. इजिप्त आपल्या नागरिकांचे संरक्षण कोणत्याही पातळीपर्यंत जाऊन करणार असून, दहशतवादाचा बीमोड करतील, असे लष्कराचे प्रवक्ते, मोहंमद समीर यांनी या निवेदनात म्हटले आहे. इजिप्तमध्ये कॉप्टिक ख्रिश्चन नागरिकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या १० टक्के आहे. इजिप्तमध्ये २०११ साली झालेल्या क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन नागरिक लिबियात गेले आहेत. सोमवारी झालेल्या लष्करी कारवाईत तीन लहान मुले व दोन महिला असे नागरिक मारले गेले. (वृत्तसंस्था)चित्रफीत प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासांनी इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांनी सरकारी टीव्हीवर जनतेला उद्देशून भाषण केले असून, या भीषण हत्याकांडाचा अशा प्रकारे प्रतिकार करणे हा इजिप्तचा हक्क असल्याचे म्हटले आहे. या हत्याकांडाचा बदला घेण्याची ही योग्य रीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ख्रिश्चन नागरिकांची अशाप्रकारे करण्यात आलेली हत्या, या विषारी हल्ल्यानंतर दहशतवादाचा जगाला विळखा घालणाऱ्या विषवल्लीचा बीमोड झालाच पाहिजे, असे अल सीसी यांनी म्हटले आहे.