शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आयएसने केली ३९ भारतीयांची हत्या?

By admin | Updated: November 28, 2014 14:59 IST

इराकमधील इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या ४० भारतीयांपैकी ३९ जणांची हत्या केल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिल्याने खळबळ माजली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २८ -  इराकमधील इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या ४० भारतीयांपैकी ३९ जणांची हत्या केल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिल्याने खळबळ माजली आहे. दोन बांगलादेशी नागरिकांच्या निवेदनाच्या आधारे हे वृत्त देण्याच आले आहे. केंद्र सरकारने मात्र हा दावा त्वरित फेटाळून लावला आहे. इराकमध्ये  पाच महिन्यांपूर्वी ४० भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते, 
आयएसच्या तावडीतून जिवंत वाचलेल्या भारतीय नागरिक हरजित याच्याशी  या दोन बांगलादेशी नागरिकांशी नागरिकांनी संपर्क साधल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे. कुर्दिस्तानची राजधानी असलेल्या एर्बिल येथे शफी व हसन या दोन बांगलादेशी नागरिकांशी बोलल्यानंतर ३९ भारतीयांची हत्या करण्यात आल्याचा दावा वाहिनीने केला आहे.
आयएसच्या तावडीतून कसाबसा जीव वाचवून पळालेल्या हरजितने इतर सर्व भारतीयांची हत्या करण्यात आली असे शफी व हसन यांना सांगितले. हरजितलाही दोन गोळ्या घालण्यात आल्या होत्या, मात्र त्याने मरण्याचे नाटक केले व संधी मिळताच तो तिथून पळाला. पाच महिन्यांपूर्वी मोसूलहून बगदाद येथे जाताना ४० भारतीयांचे अपहरण केले. आयएसने एकूण ५१ बांगलादेशी व ४० भारतीयांना बंदी बनवले होते,  असे शफीने सांगितले. 
दरम्यान भारतीय सुरक्षा अधिका-यांनीही याआधी हरजितची मुलाखत घेतली होती. त्यावेळी हरजितकडून मिळालेली माहिती व आत्ता बांगलादेशी नागरिकांनी दिलेली माहिती याच बराच फरक असल्याचे सांगत आयएसच्या ताब्यातील भारतीयांची हत्या करण्यात आल्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.