बैरूत : सिरियात हिंसाचाराचा हैदोस घालणाऱ्या इसिस संघटनेने पुन्हा कोबाने शहरात प्रवेश केला असून, कोबाने शहराजवळील एका गावात २३ कुर्दिश नागरिकांना ठार मारण्यात आले आहे. मृतांत महिला व लहान मुलेही आहेत. सिरियाच्या मानवी अधिकार संघटनेने ही माहिती दिली. कुर्दिश बंडखोरांनी हे शहर पाच महिन्यांपूर्वी इसिसच्या ताब्यातून सोडविले होते. या शहरात गुरुवारी इसिसचा प्रवेश होताच मोठ्या प्रमाणावर चकमकी व घातपात सुरू झाले आहेत. गेले चार महिने हे शहर ताब्यात घेण्याचा इसिसचा प्रयत्न चालला होता; पण कुर्दिश बंडखोरांनी अमेरिकी विमान हल्ल्याच्या साहाय्याने हे शहर ताब्यात ठेवले होते. सीमेवरचे हे शहर ताब्यातून जाणे म्हणजे पराभव असे या भागातील गणित आहे. (वृत्तसंस्था)
कोबाने शहरावर इसिसचा पुन्हा ताबा
By admin | Updated: June 25, 2015 23:56 IST