शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इराणवरील निर्बंध हटवले

By admin | Updated: January 18, 2016 03:40 IST

इराणने आपला अण्वस्त्रे विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम नियंत्रणात ठेवण्याचा ऐतिहासिक करार महासत्तांशी केल्यानंतर अमेरिका आणि युरोपियन युनियनने रविवारी त्याच्यावरील

वॉशिंग्टन/ व्हिएन्ना : इराणने आपला अण्वस्त्रे विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम नियंत्रणात ठेवण्याचा ऐतिहासिक करार महासत्तांशी केल्यानंतर अमेरिका आणि युरोपियन युनियनने रविवारी त्याच्यावरील तेलाचे आणि आर्थिक निर्बंध मागे घेतले. हे अतिशय कठोर आणि झोंबणारे निर्बंध मागे घेतल्यानंतर इराणची १०० अब्ज अमेरिकन डॉलर किमतीची अडकवून ठेवलेली मालमत्ताही खुली करण्यात आली.आजचा दिवस हा सुरक्षित जगासाठीचा म्हणून महत्त्वाचा आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी व्हिएन्नामध्ये सांगितले. जागतिक अणुऊर्जा संस्थेने इराणने दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत, असे प्रमाणपत्र दिल्याचेही केरी म्हणाले. अमेरिकन निर्बंधांशी संबंधित जी आश्वासने होती त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे, असे सांगताना केरी यांनी इराणवर लादलेले निर्बंध काढून घेण्यात आल्याची घोषणा केली. प्रदीर्घ काळापासून इराण आणि अमेरिका यांनी आपापल्या ताब्यातील कैद्यांची अदलाबदल केल्यानंतर काही तासांतच ही घोषणा झाली. इराणचा हा ऐतिहासक करार अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि जर्मनीशी जुलै २०१५ मध्ये झाला होता.इराणने आपला अणुकार्यक्रम हा शांततेसाठीच असल्याचा दावा नेहमीच केला होता. निर्बंध काढून टाकण्यात आल्यामुळे आता इराणला तेल आंतरराष्ट्रीय बाजारात विकता येईल, बँकेच्या जागतिक व्यवस्थेशी इराण जोडला जाईल. अमेरिकेने लादलेले आर्थिक निर्बंध काढून टाकण्यात आल्याच्या आदेशावर अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वाक्षरी केली.कष्टसाध्य करार-चीनबीजिंग : इराणसोबत करार हा अतिशय कष्टांनी साध्य झालेला असून त्यामुळे जे निर्बंध काढून घेण्यात आले त्याबद्दल आनंद व्यक्त करावा एवढे ते महत्त्वाचे आहेत, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)