शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

इराणने १० वर्षे अणुकार्यक्रम बंद करावा -ओबामा

By admin | Updated: March 4, 2015 00:13 IST

इराणला आमच्याशी करार करायचा असल्यास कमीत कमी दशकभरासाठी आपला आण्विक कार्यक्रम बंद करण्याची मागणी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे.

वॉशिंग्टन : इराणला आमच्याशी करार करायचा असल्यास कमीत कमी दशकभरासाठी आपला आण्विक कार्यक्रम बंद करण्याची मागणी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, इस्रायली पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू हे अमेरिकी संसदेला संबोधित करण्यापूर्वी हा इशारा दिला आहे.जागतिक महासत्ता व इराण यांच्यातील अणुचर्चा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या ३१ मार्चपूर्वी याची रूपरेषा जगापुढे येणे अपेक्षित आहे. दरम्यान, इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू हे हा करार करू नये म्हणून ओबामा प्रशासनावर दबाव आणण्यासाठी काँग्रेसला आवाहन करणार आहेत. नेतान्याहू मंगळवारी काँग्रेसला संबोधित करतील. रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असलेले सभागृह अध्यक्ष जॉन बोईनर यांनी त्यांना आमंत्रित केले असून यावरून डेमोक्रॅटिक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.नेतान्याहू यांना येत्या दोन आठवड्यांत देशांतर्गत निवडणुकीस सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्या लिकुड पक्षावर इराणशी जागतिक महासत्तांचा अणुकरार होऊ नये, म्हणून देशातून मोठा दबाव आहे. नेतान्याहू हे ओबामा यांची भेट न घेताच मायदेशी परतण्याचे संकेत आहेत.इराणशी अणू वाटाघाटीवरून इस्रायलशी निर्माण झालेले मतभेद ही कायमस्वरूपी बाब नाही, असा दावाही ओबामांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. ओबामांनी इशारावजा शब्दांत स्पष्ट केले की, नेतान्याहू यांचा इराणशी अणुकरार करण्याबाबत अगोदरचा दृष्टिकोन चुकीचा आहे. इस्रायलला असलेला कथित धोका रोखण्यासाठीचा हा सर्वोत्तम मार्ग असल्याचा दावाही त्यांनी केला. तत्पूर्वी, नेतान्याहू यांनी अमेरिकी काँग्रेसमध्ये ऐतिहासिक भाषणाच्या पूर्वसंध्येला सांगितले की, अमेरिका व इराण यांच्यातील अणुकराराने ‘इस्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो.’ अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी व त्यांचे इराणी समपदस्थ मोहंमद जावेद जरीफ यांच्यात स्वीत्झर्लंडमध्ये चर्चा सुरू असून ती बुधवारी समाप्त होण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)