शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

इराण : विमान कोसळून ३८ प्रवासी ठार

By admin | Updated: August 11, 2014 01:28 IST

इराणमध्ये रविवारी प्रवासी विमान कोसळून ३८ जण ठार झाले. विमानाने तेहरान येथून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात ते दुर्घटनाग्रस्त झाले. सुदैवाने जमिनीवरील भीषण प्राणहानी थोडक्यात टळली.

तेहरान : इराणमध्ये रविवारी प्रवासी विमान कोसळून ३८ जण ठार झाले. विमानाने तेहरान येथून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात ते दुर्घटनाग्रस्त झाले. सुदैवाने जमिनीवरील भीषण प्राणहानी थोडक्यात टळली. हे विमान तबास शहराकडे जात होते. मेहराबाद येथील विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर ते आझादी भागात एका लष्करी वसाहतीजवळ कोसळले. विमानातील ३८ जण मारले गेले आहेत, असे एका अग्निशमन कर्मचाऱ्याने इरणा या वृत्तसंस्थेला सांगितले. सेपाहन एअरलाईनच्या या विमानात सहा मुलांसह ३२ प्रवासी आणि आठ विमान कर्मचारी होते, असे इराणचे उप वाहतूकमंत्री अहमद मजिदी यांनी सांगितले. विमानाच्या अवशेषांमधून काळा धूर बाहेर पडत होता. हे विमान बाजारपेठेजवळील एक भिंत आणि झाडावर आदळले. ‘घटनास्थळी अत्यंत भीषण दृश्य होते. आम्ही सुदैवी आहोत. कारण, दुर्घटनास्थळावरून केवळ ५०० मीटरवर बाजारपेठ आहे. दुर्घटना झाली तेव्हा बाजारपेठेत गर्दी होती. हे विमान जर तेथे कोसळले असते तर काय झाले असते या कल्पनेनेच काळजात धस्स होते, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, मी दुचाकीवरून जात होतो, तेव्हा पाठीमागून आवाज आला. मी दुचाकी वळविली आणि पाहतो तर पाठीमागे विमान. विमान अगदी जवळ असल्याने मी दुचाकीवरून उतरलो. इराणच्या नागरी उड्डयन प्राधिकरणचे प्रमुख अलीरेझा जहाँगिरीयन म्हणाले की, हे विमान झाडात कोसळले. जमिनीवर कोणतीही प्राणहानी झाली नाही. दरम्यान, विमान दुर्घटनेचे कारण समजू शकले नाही. (वृत्तसंस्था)