शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भारतात भरपूर गुंतवणूक करा, चीनचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 06:42 IST

सुवर्ण भरारी घेण्याच्या तयारीत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत भरपूर गुंतवणूक करा, असे आवाहन चीनी नागरिकांना चीनच्या सरकारी मालकीची बँक द इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक आॅफ चायनाने केले आहे.

बीजिंग : सुवर्ण भरारी घेण्याच्या तयारीत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत भरपूर गुंतवणूक करा, असे आवाहन चीनी नागरिकांना चीनच्या सरकारी मालकीची बँक द इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक आॅफ चायनाने केले आहे. हे आवाहन करताना बँकेने चीनचा पहिला फक्त भारतासाठी सार्वजनिक गुंतवणुकीचा निधी (फंड) सुरू केला आहे.अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची वुहान येथे अनौपचारिक भेट झाली होती. भेटीत उभय नेत्यांनी आपापल्या आर्थिक क्षमतांना नव्या दिशा देण्यासाठी द्विपक्षीय संबंधांचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भारतात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी वरील लक्षणीय पुढाकार घेतला गेला, असे निरीक्षकांचे मत आहे. या गुंतवणूक निधीचे नाव इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक क्रेडिट सुस्सी इंडिया मार्केट फंड असे आहे.युरोप व अमेरिकेत नोंदणीकृत व भारतीय बाजारपेठेवर आधारित असलेल्या २० पेक्षा जास्त एक्स्चेंजेसमध्ये बँक गुंतवणूक करील. भारतात गुंतवणुकीसाठी चीनचा हा पहिलाच जाहीर झालेला फंड आहे, असे ग्लोबल टाइम्स दैनिकाने म्हटले. ही गुंतवणूक प्राधान्याने आर्थिक उद्योगात, त्यानंतर माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, आवश्यक वस्तू, कच्चा माल, औषधी, हेल्थ केअर व इतर उद्योगांत केली जाईल. (वृत्तसंस्था)