शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सिडनी ओलीसनाट्याची चौकशी सुरू

By admin | Updated: December 17, 2014 01:10 IST

आॅस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील एका लोकप्रिय कॅफेत सोमवारी घडलेल्या ओलिस नाट्याची चौकशी सुरु झाली आहे. १७ तासानंतर पोलीस कारवाईनंतर ओलिस नाट्य संपले.

सिडनी : आॅस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील एका लोकप्रिय कॅफेत सोमवारी घडलेल्या ओलिस नाट्याची चौकशी सुरु झाली आहे. १७ तासानंतर पोलीस कारवाईनंतर ओलिस नाट्य संपले. यात बंदुकधारी अपहरणकर्त्यासह 3 जण मारले गेले.स्थानिक माध्यमानुसार, मृतांत लिंट कॅफेचे व्यवस्थापक ३४ वर्षीय टोरी जॉनसन व ३८ वर्षीय एक महिला वकील कॅटरिना डावसन यांचा समावेश आहे. या हल्ल्यात एका पोलीसासह चार जण जखमी झाले. न्यू साऊथ वेल्सच्या पोलिस आयुक्तांनी सांगितले की, या घटनेत १७ जणांना ओलिस ठेवण्यात आले होते.मृतांना श्रद्धांजली> आॅस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अबॉट यांच्या नेतृत्वात संपुर्ण देशात सिडनी ओलिस प्रकरणात जीव गमावलेल्या दोन नागरिकांना मंगळवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. अबॉट यांनी सपत्नीक कॅफेला भेट दिली व श्रद्धांजली अपर्ण केली. पंतप्रधानांनी घटनास्थळी ठेवण्यात आलेल्या शोक पुस्तिकेत आपला संदेश लिहला. ‘टोरी जॉनसन व कॅटरिना डावसन यांच्या कुटुंबियांच्या दुखात आम्ही सामील आहोत. हल्ल्यातील मृत हे सर्वसाधारण लोकांप्रमाणेच सभ्य व चांगले नागरिक होते,’ अशा शब्दांत अबॉट यांनी श्रद्धांजली वाहिली.> शेकडो लोकांनी मार्टिन प्लेसवर मृतांना मेणबत्या पेटवून श्रद्धांजली वाहिली. आॅस्ट्रेलियात ठिकठिकाणी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले होते. मृतांच्या स्मृतीप्रीत्यर्थ न्यू साऊथ वेल्स येथील सर्व सरकारी इमारतींवरील झेंडे अर्ध्यावर आणण्यात आले आहेत. पोलीस हल्लेखोराच्या उद्देशाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर संपुर्ण आॅस्ट्रेलियात सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी तपास यंत्रणा सर्व स्तरावर कसुन चौकशी करत आहेत.