शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

बचावलेल्या मुुलीने दिली दुर्घटनेची माहिती

By admin | Updated: January 4, 2015 01:42 IST

अमेरिकेतील लियॉन प्रांतात. विमान अपघातातून सुदैवाने बचावलेल्या ७ वर्षांच्या अमेरिकन मुलीचे धाडस चकित करणारे आहे.

कुटुंबीयांचा मृत्यू : विमानाच्या अवशेषातून बाहेर पडत रात्रभर तुडवले जंगलन्यूयॉर्क : दैवी चमत्कारासोबत शोकांतिकेचा प्रत्यय देणारी ही मन हेलावून टाकणारी घटना घडली अमेरिकेतील लियॉन प्रांतात. विमान अपघातातून सुदैवाने बचावलेल्या ७ वर्षांच्या अमेरिकन मुलीचे धाडस चकित करणारे आहे. फ्लोरिडाहून इलिनोईसकडे जाणाऱ्या पाईपर-पीए-३४ या विमानात ती आई-वडिलांसोबत होती. इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे वैमानिकाने नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर विमानाचा संपर्क तुटला होता. नंतर हे विमान लियॉन प्रांतांतील एका जंगलात कोसळले. विमानाचे तुकडे-तुकडे झाले. या दुर्घटनेत तिच्या आई-वडिलांसह चौघांचा मृत्यू झाला. सुदैवाने ती बचावली. हा दैवी चमत्कारच.तुकडे-तुकडे झालेल्या विमानाच्या अवशेषातून स्वत:हून बाहेर पडत ती त्या रात्री (शुक्रवारी) वाट दिसेल तशी भटकत एका घराजवळ पोहोचली. ७१ वर्षीय लॉरी विकिन्स बाहेर येऊन पाहतात तर एक छोटी मुलगी दारात रडत उभी होती. तिचे कपडे रक्ताने माखले होते आणि अनवाणी होती. अशा अवस्थेतही तिने सर्व धैर्य एकवटून विमान कोसळल्याची माहिती दिली. या दुर्घटनेत माझे आई-वडील मरण पावल्याचे तिने सांगताच लॉरी विकिन्स हेही गहिवरले. तिला घरात घेऊन त्यांनी तिचे कपडे धुतले आणि तिला स्वच्छ केल्यानंतर त्यांनी पोलिसांना या मुलीची व्यथा कळविली, असे त्यांनी एनबीसी न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले. केंटकी प्रांत पोलिसांच्या माहितीनुसार या विमान दुर्घटनेत मार्टी गत्झलेर (४९), किम्बेर्ली गत्झलेर (४५), पाईपर गत्झलेर (९) आणि सिएरा वॅल्डर (१४) ठार झाले. पोलिसांनी तिला उपचारासाठी इस्पितळात दाखल केले आहे. तिची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. (वृत्तसंस्था)