शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक २००३ च्या शस्त्रसंधी कराराचे पालन करणार

By admin | Updated: September 22, 2015 21:43 IST

सीमेवरील तणाव : वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याची माहिती

सीमेवरील तणाव : वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याची माहिती
नगरोटा (जम्मू-काश्मीर): सीमेवरील गोळीबाराचे लक्ष्य ठरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारत आणि पाकिस्तानच्या सेनेने चिंता जाहीर केली असून उभयंतामध्ये इ.स.२००३ च्या शस्त्रसंधी करारातील सिद्धांतांचे तंतोतंत पालन करण्यावर सहमती झाली असल्याची माहिती एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिली.
१६ व्या कोरचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्टनंट जनरल आर.आर. निंभोरकर यांनी मंगळवारी येथे एका समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर शांतता आणि सौहार्द राखण्याच्या दृष्टीने विविध यंत्रणा स्थापन केल्या जाणार आहेत. दोन्ही बाजूंचे याशिवायही अनेक मुद्यांवर एकमत झाले आहे. पुंछमध्ये सोमवारी झालेल्या ध्वज बैठकीतील निष्कर्षांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
आम्ही काही कठोर संदेश देण्याच्या हेतूने ध्वज बैठकीला गेलो नव्हतो असे स्पष्ट करताना निंभोरकर म्हणाले, या बैठकीचा मुख्य उद्देश सीमेवर शांतता आणि सौहार्द कायम कसे राखता येईल याबाबत उपाययोजना करणे हा होता. कारण गोळीबारात दोन्ही देशांचे नागरिक ठार झाले आहेत. नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.
बैठकीतील निर्णयाबाबत पाकिस्तानवर विश्वास ठेवता येणार काय, असा प्रश्न विचारला असता ते आश्वासन पाळणार नाहीत असे वाटत नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये पाकसमर्थित दहशतवाद आणि घुसखोरीचा मुद्दा मात्र या बैठकीत चर्चेला आला नाही.
(वृत्तसंस्था)