शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
4
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
5
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
6
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
7
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
8
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
9
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
10
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
11
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
12
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
13
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
14
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
15
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
16
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
17
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
18
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
19
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
20
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!

भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या MTCR गटात भारताचा समावेश

By admin | Updated: June 8, 2016 08:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौ-यात भारताच्या मुत्सद्देगिरीला महत्वपूर्ण यश मिळाले आहे.

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. ८ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौ-यात भारताच्या मुत्सद्देगिरीला महत्वपूर्ण यश मिळाले आहे. भारताचा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण आणि हस्तांतरण (एमटीसीआर) देशांच्या गटात समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताने या ३४ देशांच्या संघटनेत सहभागी होण्यासाठीचे सर्व अडथळे पार केले आहेत. 
 
भारताच्या प्रवेशावर हरकत घेण्यासाठी ३४ देशांना सोमवारपर्यंत अंतिम मुदत होती. पण कुठल्याही देशाने भारताच्या प्रवेशावर आक्षेप नोंदवला नाही. भारत या गटातील ३५ वा देश असेल.  राजकीय एकमत घडून आल्यामुळे एमटीसीआरमध्ये भारताचा प्रवेशाचा मार्ग सुकर झाला असे अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ अधिका-याने सांगितले. 
 
आता फक्त काही तांत्रिक मुद्दे असून, भारताच्या प्रवेशाच्या घोषणेची औपचारीकता बाकी आहे. न्यूक्लियर सप्लायर ग्रुपमध्येही भारताच्या समावेशाला अमेरिकेचा पाठिंबा असून, भारताला या गटाचे सदस्यत्व मिळवून देण्याचे मुख्य लक्ष्य आहे असे या अधिका-याने सांगितले. 
 
एनएसजी गटातील जे देश आहेत. त्यातील चीन वगळता बहुतांश देशांनी भारताच्या एनएसजी सदस्यत्वाचे समर्थन केल आहे.  भारताचा मार्ग रोखण्यासाठी चीनने पाकिस्तानलाही सदस्यत्व देण्याची मागणी केली आहे. अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे चीनला स्पष्ट संदेश मिळाला आहे. एमटीसीआर आणि एनएसजीमध्ये समावेशासाठी भारत मागच्या दशकभरापासून प्रयत्न करत होता. 
 
एमटीसीआरमुळे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळवणे होणार सोपे
एमटीसीआरमध्ये समावेशाचे काही फायदेही आहेत आणि बंधनेही आहेत. एमटीसीआरमध्ये प्रवेश केल्यानंतर भारताला आपल्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि प्रक्षेपणाची माहिती सदस्य देशांना द्यावी लागेल. देशाच्या पुढच्या टप्याप्याच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमावर याचा काहीही परिणाम होणार नाही. कारण यामध्ये क्षेपणास्त्र विकासावर कुठलेही कायदेशीर बंधन नाही. या गटात समावेश केल्यामुळे दुस-या देशांकडून क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळवणे भारतासाठी अधिक सोपे होणार आहे. पण भारताने तंत्रज्ञान दुस-या देशाला दिले किंवा व्यवहार केला तर त्याची माहिती सदस्य देशांना द्यावी लागेल.