शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

पाकला चँपियन्स ट्रॉफीबाहेर काढण्यासाठी बांग्लादेशाला जिंकवण्याचा भारताचा कट?

By admin | Updated: June 22, 2015 16:08 IST

भारताचा बांग्लादेशविरोधात झालेला पराभव हा पाकिस्तानला चँपियन्स ट्रॉफीबाहेर काढण्याचा कट असल्याचा खळबळजनक आरोप पाकिस्तानचा माजी गोलंदाज सर्फराज नवाझ याने केला आहे.

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद (पाकिस्तान), दि. २२ - भारताचा बांग्लादेशविरोधात झालेला पराभव हा पाकिस्तानला चँपियन्स ट्रॉफीबाहेर काढण्याचा कट असल्याचा खळबळजनक आरोप पाकिस्तानचा माजी गोलंदाज सर्फराज नवाझ याने केला आहे. भारताला कधीच पाकिस्तान चँपियन्स ट्रॉफीत नको असायचा त्यामुळे पात्र संघाच्या यादीतून पाकिस्तानला बाहेर हुसकावण्यासाठी भारत जाणुबूजून बांग्लादेशाविरोधात एकदिवसीय मालिका हरत असल्याचा खळबळजनक आरोप सर्फराझने केला आहे.
येती चँपियन्स टॉफी २०१७ मध्ये इंग्लंड व वेल्समध्ये होणार आहे. येत्या ३० सप्टेंबर रोजी जागतिक क्रमवारीत जे सर्वोत्कृष्ट ८ संघ असतिल त्यांचाच समावेश चँपियन्स ट्रॉफीमध्ये होणार आहे.
बांग्लादेशच्या भारतावरील विजयानंतर पाकिस्तान एकदिवसीय रँकिंगमध्ये नवव्या स्थानावर गेले आहे तर बांग्लादेश सातव्या स्थानावर आला आहे. पाकिस्तान यानंतर पाच एकदविसीय सामन्यांची केवळ एक मालिका श्रीलंकेशी श्रीलंकेमध्ये खेळणार आहे, जी त्यांच्यासाठी नक्कीच आव्हानात्मक असेल.
बांग्लादेशाने भारताचा पहिल्या सामन्यात ७९ धावांनी पराभव केला तर दुस-या सामन्यात सहा गडी राखून हरवले आणि मालिका खिशात टाकली. याआधी पाकिस्तानला ३-० असे हरवणा-या बांग्लादेशने भारताविरुद्धची मालिका जिंकत चँपियन्स ट्रॉफीमध्ये प्रवेश निश्चित केला आहे आणि पाकिस्तान चँपियन्स ट्रॉफीबाहेर फेकले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्फराझच्या या आरोपांचा समावेश असलेल्या मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर चांगलीत व्हायरल झाली असून भारतीय संघ या बाबत काय प्रतिक्रिया व्यक्त करतो हे बघण्याची उत्सुकता क्रीडा रसिकांना लागली आहे.
 
एकदिवसीय आयसीसी क्रिकेट रँकिंग खालीलप्रमाणे:
 
स्थानसंघरेटिंग
 
ऑस्ट्रेलिया                १२९
भारत        ११४
न्यूझिलंड         ११२
द. अफ्रिका        ११२
श्रीलंका१०६
इंग्लंड९८
बांग्लादेश        ९३
वेस्ट इंडिज        ८८
पाकिस्तान        ८७
१०आयर्लंड        ५०
११झिम्बाब्वे        ४४
१२अफगाणिस्तान४१