शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे पितळ उघडे पडले - पाकिस्तान

By admin | Updated: February 19, 2015 09:46 IST

पाकिस्तानहून आलेल्या संशयास्पद बोटीसंबंधी तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांच्या बेजबाबदार विधानामुळे पाकिस्तानला भारतावर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. १९ - पाकिस्तानहून आलेल्या संशयास्पद बोटीसंबंधी तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांच्या बेजबाबदार विधानामुळे पाकिस्तानला भारतावर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. पाक बोटीमध्ये कसा स्फोट घडला हे भारताने स्पष्ट करावे अशी मागणी पाकिस्तानने केली असून या घटनेमुळे भारताचा दुष्ट चेहरा समोर आला अशी टीकाही पाकिस्तानी नेत्यांनी सुरु केली आहे. 

३१ डिसेंबर २०१४ रोजी गुजरातमधील पोरबंदरजवळील समुद्रात पाकिस्तानमधून आलेली बोट संशयास्पदस्थितीत आढळली होती. या बोटीचा भारताच्या तटरक्षक दलाने पाठलाग केला असता बोटीतील चौघा संशयित दहशतवाद्यांनी बोटीत बाँबस्फोट घडवत बोटीला उडवले असे सांगितले जात होते. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी बोटीतील संशयीत अतिरेक्यांनी स्वतःच बोटीला आग लावून स्फोट घडवून आणला असा दावा केला होता. मात्र बुधवारी तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्ष बी.के. लोशाली यांच्या एका व्हिडीओने केंद्र सरकारची चांगलीच कोंडी केली. त्या बोटीला उडवण्याचे आदेश मीच दिले होते, मला त्या मंडळींना बिर्यानी द्यायची नव्हती असे लोशाली यांनी म्हटल्याचे व्हिडीओत दिसत आहे. लोशाली यांनी संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाशी विसंगत भूमिका मांडल्याने वाद निर्माण झाला असून पाक बोटीचे नेमके झाले काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाकिस्ताननेही यावरुन भारतावर टीका केली.

भारताचा दुष्ट चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला असून त्यांचे शांततेसाठी काय प्रयत्न सुरु आहेत असा खोचक टोलाही पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी लगावला आहे.तर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या घटनेची माहिती मागवल्याचे सांगितले.