शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांना ग्रीन कार्डवर आता थेट दुबईत प्रवेश

By admin | Updated: March 29, 2017 23:15 IST

भारतीय पासपोर्ट धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

ऑनलाइन लोकमतदुबई, दि. 29 - भारतीय पासपोर्ट धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेचा व्हिजा किंवा ग्रीन कार्ड असलेल्यांना आता थेट यूएईमध्ये प्रवेश करता येणार आहे. यूएईत प्रवेश केल्यावर त्यांना व्हिजा मिळणार आहे. यूएईच्या कॅबिनेटनं या विधेयकाला मंजुरी दिली असून, आज त्याची घोषणा करण्यात आली. मात्र हा व्हिजा फक्त 14 दिवसांपुरता मर्यादित असेल. तसेच अतिरिक्त शुल्क देऊन तुम्हाला हा व्हिजा आणखी वाढवता येणार आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय राजकीय, आर्थिक आणि व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं यूएईनं हे पाऊल उचललं आहे. त्याप्रमाणेच जागतिक पर्यटनालाही चालना देण्याचा यूएईचा उद्देश आहे. ज्या भारतीय नागरिकांकडे साधा पासपोर्ट किंवा ग्रीन कार्ड आहे, अशा नागरिकांना यूएईमध्ये प्रवेश केल्यानंतर व्हिजा मिळणार आहे. मात्र हा व्हिजा 14 दिवसांपुरताच मर्यादित राहणार आहे. मात्र या व्हिजाचं नूतनीकरण करायचे असल्यास तुम्हाला अधिकचे शुल्क भरावे लागणार आहे, अशी माहिती यूएईनं दिली आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या माध्यमातून दरवर्षी जवळपास 6 हजार कोटी डॉलरची उलाढाल होते. मेकिंग इंडियासाठी भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश हा यूएई आहे. यूएई भारतात 2700 कोटी डॉलरचा माल निर्यात करतो, तर भारत 45,000 कंपन्यांच्या माध्यमातून 3300 कोटी डॉलरचा माल यूएईमध्ये निर्यात करतो. त्याचप्रमाणे यूएई भारतात ऊर्जा, धातू उद्योग, सेवा, तंत्रज्ञान आणि बांधकाम आदी क्षेत्रात एक हजार कोटी डॉलरची गुंतवणूक करत आहे.