मेलबोर्न : माहिती तंत्रज्ञान सल्लागार प्रभा अरूण कुमार (४१) यांचा सिडनीतील वेस्टमिड उपनगरात शनिवारी निर्घृण खून झाला. कुमार यांच्या घराजवळ असलेल्या पार्कमध्ये त्यांचा खून झाला, असे पोलिसांनी रविवारी सांगितले. हल्लेखोराचा शोध सुरू आहे.प्रभा अरूण कुमार नातेवाईकाशी फोनवर बोलत असताना त्यांच्यावर हल्ला झाला, त्यांनीही भोसकण्यात आल्याचे फोनवर बोलताना सांगितले होते. प्रभा कामावरून घरी पायी जात असताना त्यांना भोसकण्यात आले. रात्री उशिरा कोण्या वाहनचालकाला लिफ्ट मागण्यात मला अपराधी वाटायचे, असे त्यांनी स्वत: सांगितले होते. एका महिलेने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, या पार्कमध्ये कसा धोका होऊ शकतो याची प्रभाला कल्पना दिली होती. या पार्कमधून जाणे सुरक्षेचे नाही. तेथून जाणाऱ्यांना काही लोक अगदी दोन डॉलरसाठीही अडवतात, असे मी तिला म्हणाले होते. (वृत्तसंस्था)
भारतीय महिलेचा आॅस्ट्रेलियात भोसकून निर्घृण खून
By admin | Updated: March 8, 2015 23:09 IST