शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चिनी नौदलाच्या संचलनात भारताच्या युद्धनौकांचा सहभाग; पाकिस्तान दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 02:45 IST

चीनच्या ३२ युद्धनौका, ३९ विमानांचाही समावेश

बीजिंग : चीनच्या नौदलाला ७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष संचलनात आयएनएस कोलकातासह भारताच्या दोन युद्धनौकांनी सहभाग नोंदवला. आयएनएस कोलकाता ही देशात निर्माण केलेली सर्वांत मोठी युद्धनौका आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान यापासून दूर राहिला.चीनचे राष्टÑपती शी जिनपिंग हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या संचलनात पीपल्स लिबरेशन आर्मी नेवीच्या ३२ युद्धनौकांनी सहभाग घेतला. नौदलाची ३९ लढाऊ विमानेही यात सहभागी झाली होती. शी जिनपिंग हे कम्युनिस्ट पार्टी आॅफ चायनाचे अध्यक्ष असण्याबरोबरच लष्कराचे प्रमुखही आहेत.चीनने आपली पहिली विमानवाहक युद्धनौका लिओनिंगसह आपल्या अत्याधुनिक अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या, विनाशिका, लढाऊ जेटही या संचलनात सादर केले. लिओनिंग ही पूर्व सोव्हियत संघाची युद्धनौका आहे, जी पुन्हा नव्याने तयार करण्यात आली आहे. या संचलनात हवामानाने फारशी साथ दिली नाही व आकाशात धुके व्यापलेले होते. यामुळे उपस्थितांना कमी दृश्यमानतेत हा कार्यक्रम पाहावा लागला. भारताच्या आयएनएस कोलकाता व आयएनएस शक्तीने यात सहभाग घेतला.मंगळवारी झाली संचलनाची सांगताभारत, सिंगापूर, रशिया व जपाननेही आपल्या अत्याधुनिक युद्धनौका यात पाठविल्या होत्या. यात १३ देशांनी १८ युद्धनौका पाठविल्या होत्या. चीनच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या युद्धनौकांच्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले असून, दोन्ही देशांतील लष्करी संबंधांतील सुधारणेचे हे संकेत आहेत, असे म्हटले आहे. मंगळवारी या संचलनाची सांगता झाली.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलchinaचीन