शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत शिक्षणासाठी अर्ज करणारे भारतीय विद्यार्थी घटले

By admin | Updated: March 29, 2017 01:51 IST

वर्ण आणि वंश भेदावरून होणारा हिंसाचार आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून व्हिसाच्या नियमांत होणाऱ्या बदलांच्या धास्तीमुळे

वॉशिंग्टन : वर्ण आणि वंश भेदावरून होणारा हिंसाचार आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून व्हिसाच्या नियमांत होणाऱ्या बदलांच्या धास्तीमुळे अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीत खूपच घट झाली आहे. अमेरिकेतील सहा मोठ्या उच्च शिक्षण गटांनी २५० पेक्षा जास्त अमेरिकन महाविद्यालये आणि विद्यापीठांत केलेल्या पाहणीतून हे चित्र समोर आले आहे. (वृत्तसंस्था)भारत, चीन, नेपाळमधील अमेरिकन वकिलातून विद्यार्थ्यांना व्हिसा नाकारणे आणि इतर देशांतील खासगी व्यक्तींचे आता चांगले स्वागत होण्याचे वातावरण अमेरिकेत घटल्याची भावना विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये निर्माण झाली आहे. व्हिसाचे फायदे (प्रवास करता येणे, प्रवासानंतर अमेरिकेत पुन्हा प्रवेश मिळणे आणि रोजगाराची संधी) व व्हिसावरील बंधनांमध्ये बदल होऊ शकतील याचीही काळजी इच्छूक अर्जदारांना वाटते. भारताने गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय व डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घटलेले मूल्य हेदेखील मुद्दे या काळजीत भर घालणारे आहेत, असे वृत्तात म्हटले आहे.भारतीय विद्यार्थ्यांतून पदवी शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांत 26% तर पदवीनंतरच्या शिक्षणासाठी 15% घट झाली आहे. ‘ओपन डोअर्स २०१६’ या नावाचा हा पाहणी अहवाल या आठवड्यात उपलब्ध होईल.उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरून होणाऱ्या अर्जांत सरासरी 40% घट झाली आहे. सध्या अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्यांत  47%  विद्यार्थी (जवळपास पाच दशलक्ष) हे भारत आणि चीनचे आहेत. अमेरिकेत चीनमधून पदवीसाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जांत २५ टक्के आणि पदवीनंतरच्या शिक्षणासाठीच्या अर्जांत ३२ टक्क्यांची घट झाली आहे.