शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

अमेरिकेतील हार्वे वादळात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, २०० भारतीय विद्यार्थी अडकले

By पवन देशपांडे | Updated: August 30, 2017 12:41 IST

अमेरिकेतील टेक्सास प्रांतात आलेल्या भयंकर हार्वे वादळाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, एका २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे

ह्युस्टन, दि. 30 - अमेरिकेतील टेक्सास प्रांतात आलेल्या भयंकर हार्वे वादळाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, एका २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ह्युस्टन येथे या वादळात आतापर्यंत २०० विद्यार्थी अडकलेले आहेत. 

टेक्सासच्या एअँडएम विश्वविद्यालयात निखिल भाटिया शिकत होता. तो आपल्या मैत्रिणीसोबेत शनिवारी ब्रायन तलावात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या मैत्रिणीची प्रकृती गंभीर आहे. भारतीय दूतावासाच्या अधिका-यांनी सांगितले की, निखिल भाटियाच्या घरच्यांशी आम्ही संपर्कात आहोत. तसेच त्याच्या मैत्रिणीला ज्या रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे त्यांच्याशीही संपर्क ठेवून होतो. निखिल भाटिया हा मूळचा जयपूरचा आहे. तर त्याची मैत्रीण शालिनी सिंह नवी दिल्ली येथील रहिवासी आहे. 

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, निखिल आणि त्याची मैत्रिण तलावात पोहत होते. मात्र अचानक पाणी वाढले आणि पाण्याचा वेगही वाढला. त्यात ते खेचले गेले. त्यांच्यासोबत असलेल्या इतर मित्रांनी स्थानिक पोलिसांना मदतीसाठी बोलावल्यानंतर निखिल आणि त्याच्या मैत्रिणीला बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत निखिलचा मृत्यू झाला होता. 

अमेरिकेतील गेल्या 13 वर्षांतील सर्वांत मोठे वादळगेल्या तेरा वर्षांमध्ये अमेरिकेत एवढे महाभयंकर वादळ धडकले नव्हते. हार्वे वादळाचा तडाका टेक्सास या प्रांताला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यात तब्बल 1.3 कोटी लोक प्रभावित झाले असून, अनेकांची घरे कोसळली आहेत. रस्त्यावरील खांब आणि झाडेही उन्मळून पडली आहेत. अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.  

२०० भारतीय विद्यार्थी वादळात अडकलेटेक्सास राज्याच्या ह्युस्टन शहराच्या विद्यापीठात शिकणारे २०० भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न भारतीय वाणिज्य दूतावासातर्फे करण्यात येत आहेत. भारताचे महावाणिज्यदूत अनुपम राय यांनीही आम्ही टेक्सासमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी इथे असल्याचे दिलासा देणारे ट्विट केले आहे. ह्युस्टनमधील स्थानिक रहिवासीही भारतीयांना मदत करत आहे.