शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कुवैतमध्ये सरकारी संस्थांमार्फतच होते भारतीय परिचारिकांची भरती

By admin | Updated: April 11, 2017 04:29 IST

कुवैतमध्ये भारतीय परिचारिकांची भरती केवळ मान्यताप्राप्त सरकारी संस्थांमार्फतच केली जाते, अशी माहिती कुवैतमधील भारतीय दूतावासाने दिली.

दुबई : कुवैतमध्ये भारतीय परिचारिकांची भरती केवळ मान्यताप्राप्त सरकारी संस्थांमार्फतच केली जाते, अशी माहिती कुवैतमधील भारतीय दूतावासाने दिली.दूतावासाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मे २0१५ पासून परिचारिकांच्या भरतीसाठीचे हे बंधन घालण्यात आले आहे. कुवैतमधील खासगी रुग्णालयांनी याबाबत विचारणा केल्यानंतर ही माहिती जारी करण्यात आली आहे.दूतावासाने म्हटले की, मे २0१५ पासून भारत सरकारने कुवैतमध्ये भारतीय परिचारिकांची भरती करण्यासाठी काही मोजक्या सरकारच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त नोकरी भरती संस्थांना अधिकार दिले. परिचारिकांना अ‍ॅग्रीग्रेशन चेक रिक्वायर्ड (ईसीआर) व्यवस्थेत समाविष्ट करण्यात आले आहे. या व्यवस्थेत १८ देशांचा समावेश करण्यात आला आहे. या व्यवस्थेनुसार, ई-मायग्रेट सीस्टिमच्या माध्यमातून एमिग्रेशन क्लिअरन्स मिळाल्याशिवाय परिचारिकांना रोजगार देता येत नाही. १८ देशांच्या या यादीत कुवैतसह अफगाणिस्तान, बहारीन, इराक, इंडोनेशिया, सौदी अरेबिया, जॉर्डन, लिबिया, लेबनॉन, मलेशिया, ओमान, कतार, सुदान, सीरिया, थायलंड, यूएई आणि येमेन या देशांचा समावेश आहे. या सर्व देशांत भारतीय परिचारिकांना मान्यताप्राप्त सरकारी संस्थांमधून जावे लागते. (वृत्तसंस्था)अनेक संस्थांमार्फत होते नेमणूकई-मायग्रेट सीस्टिमद्वारे होणारी भरती प्रक्रिया अत्यंत सोपी, पारदर्शक आणि वापरानुकूल आहे. परिचारिकांची भरती करू इच्छिणाऱ्या कुवैतमधील संस्थांना ई-मायग्रेशन सीस्टिममध्ये स्वत:ची नोंदणी करावी लागते. दूतावासाच्या परिसरात त्यासाठी एक मदत कक्ष आहे. भारतात सहा सरकारी संस्थांना परिचारिकांच्या भरतीचे अधिकार देण्यात आले आहे. थिरुवनंतपुरमध्ये नोरका-रुट सेंटर आणि ओव्हरसीज डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट प्रमोशन कन्सल्टंट, चेन्नईत ओव्हरसीज मॅनपॉवर कॉर्पोरेशन, कानपूरमध्ये युपी फायनान्शिअल कॉर्पोरेशन, हैदराबादेत तेलंगणान ओव्हरसीज मॅनपॉवर कंपनी आणि विजयवाडा येथे ओव्हरसीज मॅनपॉवर कंपनी आॅफ आंध्र प्रदेश यांचा त्यात समावेश आहे.