शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सौदीत बेकायदा राहणारा भारतीय नागरिक परतणार

By admin | Updated: June 14, 2017 22:28 IST

सौदी अरेबियातल्या वाळवंटात गेल्या 24 वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहत असलेले भारतीय नागरिक गना प्रकासम राजामरीयन (52, रा. कन्याकुमारी, तामिळनाडू) लवकरच भारतात परतणार असल्याची आनंदाची बातमी मिळते आहे

ऑनलाइन लोकमतदुबई, दि. 14 -  सौदी अरेबियातल्या वाळवंटात गेल्या 24 वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहत असलेले भारतीय नागरिक गना प्रकासम राजामरीयन (52, रा. कन्याकुमारी, तामिळनाडू) लवकरच भारतात परतणार असल्याची आनंदाची बातमी मिळते आहे. सरकारने 90 दिवस माफीचा कालावधी दिला आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. गना हे ऑगस्ट 1994मध्ये हैल प्रांतातील एका गावात शेती करण्यासाठी आले होते. तामिळनाडूतील कन्याकुमारीला राहणारे राजमरियन म्हणाले, माझ्या पहिल्या मालकानं सहा महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला फक्त 100 सऊदी रियाल दिले होते.  त्यानंतर माझी दोन मालकांकडे बदली झाली. त्यामुळे माझा स्पॉन्सर कोण हेच मला नक्की माहीत नाही. मला त्यांच्याकडून पगारही मिळाला नाही. त्यामुळे मी बेकायदेशीरपणेच इथे राहू लागलो. माझं नशीब हे वाळवंटातच होते. येथेच मी माझं अर्धे आयुष्य इथे घालवलं आहे. मी घर सोडलं तेव्हा माझी चौथी मुलगी खूपच तरुण होती. ज्या वयात मी घर सोडलं त्या वयाची आता माझी नातवंडे आहेत. सौदी अरेबियातील कमाईवर मी माझ्या तीन मुलींचं लग्न करून देण्यास सक्षम होतो. मात्र आता माझ्याजवळ स्वतःच घर नाही. तसेच आधार कार्ड आणि मतदान कार्डही नाही. मी माझ्या पत्नीला 2015मध्ये शेवटचा फोन केला, त्यावेळी तिला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यानंतर माझं तिच्याशी कधीच बोलणं झालं नाही आणि हल्लीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अशा प्रकारे अनेक भारतीय प्रवासी सौदी अरेबियात अनधिकृतरीत्या वास्तव्य करत आहेत. त्यांना भारतात येण्याची इच्छा असून, सौदीतील कायद्यामुळे परतताना अडचणी येत आहेत. रियादमधल्या भारतीय दूतावास आणि जेद्दातल्या वाणिज्य दूतावासकडे आणीबाणीच्या प्रवासाकरता 26,713 अर्ज करण्यात आले आहेत. त्यातील उत्तर प्रदेशमधल्या 11,390, तेलंगणा 2733, प. बंगाल 2022, केरळ 1736, बिहार 1491, आंध्र प्रदेश 1120 आणि राजस्थानमधील 853 लोकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. भारतातील जवळपास हजारोंहून अधिक निर्वासित हे अनधिकृतपणे सौदी अरेबियात प्रवास करत आहेत.