शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत भारतीयांवरील हल्ले सुरूच, आता शीख तरुणावर गोळीबार

By admin | Updated: March 5, 2017 10:36 IST

अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तींवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, आजवॉशिंग्टन राज्यातील केंट भागात एका बुरखाधारी इसमाने

ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 5 - अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तींवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, आजवॉशिंग्टन राज्यातील केंट भागात  एका बुरखाधारी इसमाने भारतीय वंशाच्या शीख तरुणावर गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये हा शीख तरुण जखमी झाला आहे. दरम्यान, गोळीबार करताना हल्लेखोराने या तरुणाला मायदेशात परतण्याची धमकी दिली. 
याआधी अमेरिकेतील कॅनसस शहरात भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचीभोट आणि  43 वर्षीय हरनिश पटेल यांची   गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हरनिश पटेल यांच्या हत्येला एक दिवस उलटत नाही तोच या शीख तरुणावर हल्ला झाला आहे. हा शीख तरुण शुक्रवारी आपल्या घराबाहेर गाडीची साफसफाई करत असताना ही घटना घडली.  हल्ला झालेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव दीप राय असून, तो अमेरिकन नागरिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
( अमेरिकेत आणखी एका भारतीयाची गोळ्या घालून हत्या)
केंट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन व्यक्तींमध्ये वाद होऊन हा गोळीबार झाला. तर पीडित तरुणाने सांगितले की एक बुरखाधारी व्यक्ती आपल्या जवळ आली आणि त्याने मला आपल्या देशात परत जाण्याचे बजावत गोळीबार केला. दरम्यान केंट पोलिसांनी या प्रकाराच्या चौकशीस सुरुवात केली असून,  तपासासाठी एफबीआयसह अन्य काही तपास यंत्रणांची मदत घेतली जात आहे.  
( भारतीय इंजिनिअरच्या हत्येचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निषेध )
22 फेब्रुवारी रोजी कॅनसस शहरात एका अमेरिकी नागरिकाने भारतीय इंजिनीअर श्रीनिवास कुचीभोटला (32) यांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर गुरुवारी 43 वर्षीय हरनिश पटेल यांची त्यांच्याच घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. 
( श्रीनिवासन यांच्या स्वप्नपूर्तीसाठी पत्नी अमेरिकेत परतणार )