शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडूनच शस्त्रसंधीचे उल्लंघन, नवाज शरीफांच्या उलट्या बोंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2016 17:57 IST

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर कोणताही तपास न करता काही तासातच भारताने पाकिस्तानला जबाबदार धरलं असं म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी कोलांटीउडी मारण्यास सुरुवात केली आहे

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 5 - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर कोणताही तपास न करता काही तासातच भारताने पाकिस्तानला जबाबदार धरलं असं म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी कोलांटीउडी मारण्यास सुरुवात केली आहे. आम्ही युद्धाविरोधात आहोत, आम्हाला शांतता हवी आहे. काश्मीरचा मुद्दा आम्ही शांततेने सोडवायचा आहे असंही नवाज शरीफ बोलले आहेत. संसदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 
 
यावेळी बोलताना नवाज शरीफ यांनी दहशतवादी बु-हान वाणीचं पुन्हा एकदा उदात्तीकरण करत त्याला नायक ठरवला. भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याच्या उलट्या बोंबा मारत उरी हल्ल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी करण्यात यावी अशी मागणीही नवाज शरीफ यांनी केली. काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी जगातील देशांनी प्रयत्न करायला हवे असंही नवाज शरीफ बोलले आहेत.
 
 
१८ सप्टेंबर रोजी बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. ज्यामध्ये २० जवान शहीद झाले. 
 
उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ४ तळांवर हल्ले करून  38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. हे दहशतवादी भारतात घुसखोरी करून घातपात घडवण्याच्या तयारीत होते, मात्र भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवादी संघटना व पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. 
 
भारतीय कमांडोनी POK मध्ये घुसून कारवाई केली - प्रत्यक्षदर्शींची माहिती
 
भारत-पाकिस्तानदरम्यान १९४९ साली कराची करार झाला, तेव्हापासून ७७५ कि.मी. अंतराच्या नियंत्रण रेषेला शस्त्रसंधी रेषा म्हणून ओळखले जात होते. १९७१पासून ती एलओसी म्हणून ओळखली जाते. तेव्हापासून प्रथमच भारतीय सैन्याने एलओसी ओलांडून थेट पीओकेमध्ये प्रवेश केला. गतवर्षी म्यानमारमध्ये भारताने सर्जिकल स्ट्राइक केला होता. मात्र जाहीरपणे त्याची कबुली दिली नव्हती. यंदा मात्र पीओकेतील दहशतवाद्यांच्या तळावर सर्जिकल स्ट्राइक केल्याची जाहीर कबुली दिली.