शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे व्हिएतनामला ५0 कोटी डॉलर

By admin | Updated: September 4, 2016 00:47 IST

भारत व व्हिएतनाम यांच्यात लष्करी सहकार्य वाढावे यासाठी भारताने व्हिएतनामला ५00 दशलक्ष डॉलरची मदत शनिवारी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या व्हिएतनामच्या

हनोई : भारत व व्हिएतनाम यांच्यात लष्करी सहकार्य वाढावे यासाठी भारताने व्हिएतनामला ५00 दशलक्ष डॉलरची मदत शनिवारी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या व्हिएतनामच्या दौऱ्यावर असून, त्यांनीच अर्थसाह्याची घोषणा केली. दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढलेल्या वावराच्या पार्श्वभूमीवर १२ करारांवरही दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. गस्ती नौकांच्या निर्मितीचा करारही त्यात आहे.हा दौरा आटोपून मोदी रविवारी चीनला जात असून, तिथे राष्ट्राध्यक्ष ली पेंग यांना भेटणार आहेत.नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनामचे पंतप्रधान न्गुयेन शियान फुक यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. त्यानंतर मोदीं यांनी पत्रकारांना सांगितले की, दोन्ही देशांनी संरक्षणविषयक सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. यामुळे द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा, गती आणि वास्तविक आयाम मिळेल.या आधी व्हिएतनामचे लष्करी करार रशिया आणि चीन यांच्यासोबतच झाले आहेत. मोदी यांनी सांगितले की, व्हिएतनामसोबत संरक्षण क्षेत्रासोबतच माहिती तंत्रज्ञान, अंतरिक्ष, सायबर सुरक्षा आणि जहाजबांधणी या क्षेत्रातही आदानप्रदान केले जाईल. (वृत्तसंस्था)मोदी यांचे व्हिएतनाममध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. मोदी यांनी हानोईमधील जगप्रसिद्ध पॅगोडा मंदिराला, तसेच महान व्हिएतनामी नेते हो ची मिन्ह यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या बांबूच्या घराला भेट दिली. व्हिएतनामचे पंतप्रधान न्गुयेन जुआन फुक यांच्यासोबत मासे पकडण्याचा आनंद त्यांनी लुटला. मोदी यांनी न्हा ट्रेंग विद्यापीठात सॉफ्टवेअर पार्क स्थापन करण्यासाठी ५0 लाख डॉलरची मदत जाहीर केली.