शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कतारमध्ये फसलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट करणार भारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 17:27 IST

मुस्लिम देशांच्या बहिष्काराचा सामना करणा-या कतारमध्ये अनेक भारतीय अडकले असून त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - मुस्लिम देशांच्या बहिष्काराचा सामना करणा-या कतारमध्ये अनेक भारतीय अडकले असून त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष विमानं पाठवण्यात येणार आहेत. कतारमध्ये जवळपास सात लाख भारतीय आहेत. 
 
दहशतवाद पसरवणे व प्रादेशिक शांतता भंग करणे या कारणांवरून सौदी अरेबिया, युएई, बहारिन व इजिप्तने कतारशी राजनैतिक संबंध तोडले आहेत. या सर्व देशांनी कतारवर दहशतवादाला समर्थन दिल्याचा आरोप लावला होता. यामुळे कतारमध्ये दैनंदिन गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला असून परिस्थिती चिघळत चालली आहे. कतारला गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करणा-या सौदी अरबने कतारला लागून असलेल्या सीमेवर सर्व प्रकारची देवाण घेवाण रोखली आहे. 
 
(दहशतवादाच्या मुद्यावर सौदी, बहारिन, युएई आणि इजिप्तची कतारला सोडचिठ्ठी)
 
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 25 जून ते 8 जुलै दरम्यान एअर इंडियाकडून केरळ ते डोहादरम्यान विशेष विमानं उड्डाण घेतील. एअर इंडियाच्या 186 आसनांच्या 737 विमानाचा वापर करण्यात येईल. याशिवाय जेट एअरवेजदेखील मुंबई ते डोहा दरम्यान गुरुवार आणि शुक्रवारी 168 आसनांची क्षमता असलेल्या बी-737 विमानाचं उड्डाण करेल.
 
केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी यासंबंधी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्याशी बातचीत केली होती. ज्या भारतीयांना मायदेशी परत यायचं आहे, मात्र बुकिंग मिळत नाही आहे त्यांच्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. यानंतर मंत्रालयाने विमान कंपन्यांशी बातचीत केली आणि अतिरिक्त विमान उड्डाण करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाला पुर्णपणे मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. 
 
कतार 4 हजार गाईंना करणार एअरलिफ्ट -
 
कतारचा शेजारच्या देशांसोबत सुरु असलेला वाद दिवसेंदिवस चिघळत आहे. अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतानाही कतारने मात्र कोणत्याही प्रकारचा करार करण्यास किंवा माघार घेण्यास नकार दिला आहे. आपल्यावर लावण्यात आलेल्या बंदीमुळे निर्माण झालेल्या समस्यांना तोंड देण्यासाठी कतार वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत आहे. यानिमित्ताने कतारमधील एका व्यवसायिकाने चार हजार गाईंना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, देशात दूध पुरवठा सुरळीत व्हावा यासाठीच या गाईंना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  
 
कतार अन्न आणि दूधासारख्या गरजू गोष्टींसाठी सौदीवर अवलंबून होतं. मात्र आता सौदीने सर्व प्रकारचे संबंध तोडले असल्याने देशात दूधसंकट उभं राहिलं आहे. या संकटाला सामोरं जात, सौदीला उत्तर देण्यासाठी कतारमधील व्यापारी मोताज अल खायात यांनी चार हजार गाईंना एअरलिफ्ट कऱण्याचा निर्णय घेतला आहे. मोताज पॉवर इंटरनॅशनल होल्डिंगचे अध्यक्षही आहेत.