शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अॅमेझॉनकडून पुन्हा तिरंग्याचा अपमान, स्टिकरवर छापला भारताचा चुकीचा नकाशा

By admin | Updated: May 9, 2017 09:53 IST

अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटने पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 9 -  अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटने पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  तसेच अॅमेझॉनच्या वेबसाइटवर विक्रीसाठी असलेल्या स्टिकरमध्ये भारताचा काही हिस्सा पाकिस्तान आणि चीनमध्ये असल्याचं दाखवण्यात आला आहे.  
 
शिवाय, भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरचा भाग वगळल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे अॅमेझॉन पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहे. दिल्लीतील भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून या सर्व प्रकाराबाबत टीका करत अॅमेझॉनविरोधात हल्लाबोल चढवला आहे.  
(परराष्ट्रमंत्र्यांच्या इशा-यानंतर अॅमेझॉन वठणीवर, मागितली माफी)
 
भारतीय राष्ट्रध्वज व नकाशाबाबतची चुकीची माहिती पसवणा-या अॅमेझॉनने तातडीने सर्व उत्पादने वेबसाइटवरुन काढून टाकावीत, अशी मागणी बग्गा यांनी केली आहे.  वेबसाइटवर उपलब्ध असलेले वॉल डेकोरेशन स्टिकरवर भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला आहे, याविरधोत बग्गा यांनी आवाज उठवला आहे. 
 
 
उत्पादनं हटवण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी
बग्गा यांनी आतापर्यंत या प्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही. मात्र, जर दोन दिवसांच्या आता  भारताचा चुकीचा नकाशा असलेले स्टिकर हटवण्यात आले नाही तर तक्रार नोंदवणार असल्याचा इशारा बग्गा यांनी दिला आहे.  
 
यापूर्वी अॅमेझॉन कॅनडाच्या वेबसाइटवर भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगासारखी पायपुसण्यांची विक्री होत असल्याची तक्रार एका भारतीय नागरिकाने केली होती.  यावेळी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कडक इशा-यानंतर अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटने स्वराज यांना पत्र लिहून माफी मागितली होती.  कॅनडा येथील अॅमेझॉनच्या वेबसाइटवर भारताच्या राष्ट्रध्वजासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली होती.
 
"भारतीयांच्या भावनांचा आम्ही आदर करतो, त्यांच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. त्या पायपुसण्या थर्ड पार्टीकडून विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या", असे पत्र अॅमेझॉनकडून सुषमा स्वराज यांना पाठवण्यात आले होते. 
एका भारतीय नागरिकाने निदर्शनास आणून दिल्यानंतर याची दखल घेत स्वराज यांनी त्या पायपुसण्यांची विक्री त्वरित थांबवण्यास आणि बिनशर्त माफी मागण्यास सांगितले होते. यानंतर अॅमेझॉननं त्वरित वेबसाइटवरील तिरंग्याचा अपमान करणारी पायपुसणी हटवली.