शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

By admin | Updated: June 4, 2017 12:14 IST

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात जवळपास 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 4 - ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात जवळपास 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याच्या  पार्श्वभूमीवर आज भारत-पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स टॉफी क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.  टीम इंडियाच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 
 
दहशतवादी हल्ला झाला तेथून 208 किलोमीटर अंतरावर भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. ब्रिटनच्या इंटेलिजन्सने बीसीसीआय आणि पीसीबी न घाबरण्याचा सल्ला दिला आहे. या हल्ल्यानंतर आयसीसीने सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, सर्व शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था चोख केली जाईल असं निवेदनाद्वारे म्हटलं आहे.  तसेच सामना नियोजित वेळेनुसारच होणार आहे. 
 
 

गतविजेता भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या सलामीला आज, रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. स्पर्धेच्या प्रारंभी संघातील वाद चव्हाट्यावर आल्याने वादाला मूठमाती देत रोमांच आणि तणाव झुगारून पाकवर विजय नोंदविण्याचे अवघड आव्हान टीम इंडियापुढे असेल. हा सामना दुपारी तीन वाजल्यापासून रंगणार आहे.

हा सामना म्हणजे पाकचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि भारतीय कर्णधार विराट कोहली यांच्यातील ‘जंग’ मानली जात आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पाकचे गोलंदाज विरुद्ध भारतीय फलंदाज अशीच ही लढत आहे. कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, युवराजसिंग आणि महेंद्रसिंग धोनी या फलंदाजांपुढे पाकचे आमिर आणि जुनैद खान यांच्यासारखे गोलंदाज आहेत. 

भारतासाठी गोलंदाजी संतुलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी हे सर्वच गोलंदाज सर्वोत्कृष्ट फलंदाजीला खिंडार पाहू शकतात. भारत-पाक सामना असेल तर तो इतर सामन्यांच्या तुलनेत वेगळा मानला जातो. सामन्याचा प्रभाव राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावरदेखील दिसून येतो. क्रिकेटपटू सामना खेळत असले तरी दोन्ही देशांतील चाहत्यांना पराभव कधीही पचनी पडत नाही. 

पाकला कसे हरवायचे हे विराटला चांगले ठाऊक आहे. पण, त्याच्या परिपक्वपणाची ही कसोटी असेल. कोच कुंबळेसोबतच्या मतभेदाचे वृत्त ऐन सामन्याच्या पूर्वसंध्येला बाहेर आले. अशावेळी मैदानाबाहेरील वाद विसरुन स्पर्धा जिंकण्याचे संघापुढे आव्हान असेल. 

दुसरीकडे पाक संघदेखील वादविवादाला अपवाद नाही. स्पर्धेआधीच उमर अकमल याला खराब फिटनेसमुळे मायदेशी परत पाठविण्यात आले. चॅम्पियन्समध्ये भारताविरुद्ध पाकचे रेकॉर्ड २-१ असा आहे. उद्याच्या लढतीत मात्र टीम इंडियाचे पारडे प्रत्येक बाबतीत जड वाटते. फलंदाजीत रोहित सहा महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळत असून, शिखर धवन २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक आहे. आजारी युवराजचे खेळणे निश्चित नाही. दिनेश कार्तिक त्याचे स्थान घेऊ शकतो. (वृत्तसंस्था)

पाऊस खलनायक ठरण्याची शक्यता

 

भारत-पाक सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने ही माहिती देताच दोन्ही देशांतील कोट्यवधी चाहते चिंताग्रस्त झाले. आज, रविवारी सामन्याच्या सकाळच्या सत्रात आणि दुपारी पाऊस कोसळू शकतो. हवामान खात्याच्या अन्य वेबसाईटस्नुसार मात्र पावसाची शक्यता ७० टक्के इतकी आहे. तथापि, इंग्लंडमध्ये सध्याच्या वातावरणात पाऊस कधी धो-धो कोसळतो, तर कधी ढगाळ हवामानामुळे हवेत गारवा असतो. अनेकदा १० मिनिटे पाऊस आल्यानंतर दिवसभर कधीही त्रास होत नाही. शुक्रवारी अधूनमधून झालेल्या पावसामुळे आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड लढतीवर पाणी फेरले गेले. अखेर उभय संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले होते.

उभय संघ यातून निवडणार

भारत

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंग, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र्र जडेजा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, रवीचंद्रन अश्विन.

 

पाकिस्तान

पाकिस्तान : सरफराज अहमद (कर्णधार) अहमद शहजाद, अजहर अली, बाबर आझम, फहीम अशरफ, फखार जमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वसीम, जुनैद खान, मोहम्मद आमिर, मोहम्मद हफीज, शादाब खान, शोएब मलिक, वहाब रियाज.