शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

सार्वभौमत्वाचे उल्लंघन टाळून संपर्क वाढवा

By admin | Updated: June 10, 2017 00:19 IST

दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन न करता कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी समूहातील देशांनी प्रयत्न

अस्ताना : दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन न करता कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी समूहातील देशांनी प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केले. कझाकिस्तानची राजधानी अस्ताना येथे आयोजित शांघाय सहकार संघटनेच्या (एससीओ) वार्षिक संमेलनात ते बोलत होते. भारत आणि पाकिस्तानला आता एससीओचे सदस्यत्व मिळाले आहे. त्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, एससीओ समूहात भारताचा झालेला प्रवेश दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवी गती देईल. दहशतवादाला तोंड देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. कट्टरवाद, अतिरेक्यांची भरती आणि प्रशिक्षण व आर्थिक मदत या धोक्यांपासून वाचण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या उपस्थितीत मोदी यांनी सांगितले की, व्यापार आणि गुंतवणुकीसाठी ही कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे.मोदी-शी चिनफिंग यांच्यात चर्चा -पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग यांच्यात शुक्रवारी येथे चर्चा झाली. एकमेकांच्या समस्यांचा सन्मान करणे आणि वादग्रस्त विषय सामंजस्याने हाताळण्यावर या दोन नेत्यांनी भर दिला. ‘बेल्ट अँड रोड फोरम’वर भारताने बहिष्कार टाकल्यानंतर या दोन नेत्यातील ही पहिलीच भेट होती. या भेटीदरम्यान मोदी म्हणाले की, चीनच्या सहकार्याशिवाय एससीओचे सदस्य होणे भारताला शक्य नव्हते.जैश -ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला अतिरेकी जाहीर करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीनने खोडा घातलेला आहे. याशिवाय एनएसजीच्या सदस्यत्वासाठीही चीनने अडथळे निर्माण केलेले आहेत. त्यामुळे उभय देशातील संबंधात काही प्रमाणात कटुता आलेली आहे. ही चर्चा अतिशय सकारात्मक झाल्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी सांगितले.