शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात इमरान खान यांना अटक करण्याचे आदेश

By admin | Updated: October 21, 2016 15:26 IST

पीटीव्हीच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तान तेहरिक ए इंसाफ पक्षाचा (PTI) अध्यक्ष इम्रान खान यांना अटक करण्याचे आदेश इस्लामाबाद येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत 
इस्लामाबाद, दि. 21 - पीटीव्हीच्या मुख्यालयावर 2014 साली झालेल्या हल्ल्याप्रकरणी इस्लामाबाद येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इमरान खान आणि पाकिस्तान अवामी तेहरिक पक्षाचे प्रमुख ताहिरुल कादरी यांना अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच इमरान खान आणि ताहिरुल कादरीसह अन्य 68 जणांना 17 नोव्हेंबरपर्यंत अटक करुन कोर्टासमोर हजर करण्यासही कोर्टाने सांगितले आहे.
 
'डॉन' वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, पीटीव्ही मुख्यालयावरील हल्ल्याप्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत, 'इमरान खान आणि ताहिरुल कादरी यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंटच्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल पोलीस सादर का करु शकले नाही', असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने पोलिसांच्या अपयशावर ताशेरे ओढले आहेत.
 
(मोदींवरून इम्रान खान देणार नवाज शरीफांना लेक्चर)
 
1 सप्टेंबर 2014 रोजी पाकिस्तान तेहरिक ए इंसाफ आणि पाकिस्तानी अवामी तेहरिकच्या कार्यकर्त्यांनी पीटीव्हीच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन केले होते. यावेळी आंदोलकांनी चॅनेलच्या मुख्यालयावर हल्ला करून पीटीव्ही न्यूज आणि पीटीव्ही वर्ल्ड या वाहिन्यांचे प्रसारण बंद पाडले होते. या प्रकरणी 70 जणांविरोधात  गुन्हा नोंदवण्यात आला होता.