शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगस्नेही धोरणांसाठी सुधारणा

By admin | Updated: April 14, 2015 01:18 IST

उद्योगस्नेही धोरणासाठी आवश्यक असल्यास सुधारणा करण्याची तयारी असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मन उद्योजकांना भारतात येण्यासाठी साद घातली.

हॅनोव्हर : उद्योगस्नेही धोरणासाठी आवश्यक असल्यास सुधारणा करण्याची तयारी असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मन उद्योजकांना भारतात येण्यासाठी साद घातली. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवायचे असून यासाठूी आमचे कायदे व आमचेच नियम असे धोरण आम्ही ठेवणार नाही, असेही मोदी यांनी स्पष्ट केले. हॅनोव्हेर येथील औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभावेळी ते सोमवारी येथे बोलत होते. जर्मनीतील टॉप उद्योगपती व व्यापारी यांच्याशी मोदींनी संवाद साधला. भारतात येताना जुन्या संकल्पना मनात ठेवू नका, भारतात या आणि नवा बदल आपल्या डोळ्यांनी पाहा असे मोदी म्हणाले. मोदी यांनी आपली मेक इन इंडिया ही योजना हॅनोव्हर फेअरमधील इंडो-जर्मन व्यापारी परिषदेचे उद्घाटन करताना मांडली. पंतप्रधान मोदी व जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या हस्ते इंडिया पॅव्हेलियनचे उद्घाटन झाले. मी पुन्हा एकदा सांगतो, भारतात या , भारतातील नियमांचे वातावरण बदलले आहे, त्याचा अनुभव घ्या. जुन्या कल्पना मनात ठेवू नका हा माझा सल्ला आहे, असे मोदी म्हणाले. मेक इन इंडिया ही गरज आहे. भारत हे जागतिक उत्पादानचे केंद्र बनवायचे असेल तर फक्त आमचेच नियम व आमचेच कायदे करून चालणार नाही. गरज असेल तिथे आम्ही सुधारणा करू ,असे मोदी यांनी सांगितले. भारतातील कायदे बदलले आहेत, आता कायदे अधिक पारदर्शी, जबाबदार व स्थिर आहेत. सर्व मुद्यांवर आमचा दृष्टिकोन दीर्घकालीन आहे. भारतात व्यवसाय करणे आता अधिक सोपे आहे. अर्ज व कायदे अगदी साधे करण्यासाठी आम्ही कसून प्रयत्न केले आहेत. विकासासाठी परदेशी भांडवल अत्यंत गरजेचे आहे. (वृत्तसंस्था)जर्मनी येथे सुरू असलेल्या उद्योग-व्यापार मेळाव्यात राज्यातील गुंतवणूक संधींचे व्यासपीठ असलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या आकर्षक स्टॉलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. महाराष्ट्रात जर्मन उद्योग चांगली कामगिरी करीत असून, आपण महाराष्ट्राला आवर्जून भेट द्यावी, असे निमंत्रण पंतप्रधानांनी जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांना या वेळी दिले. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध गुंतवणूक समूहांशी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री चर्चा करणार आहेत. या मेळाव्यात जगातील विविध नामांकित उद्योगसमूह व व्यापारी संस्थांच्या प्रतिनिधींसह संबंधित क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर देशातील विविध खासगी, सरकारी कंपन्या तसेच अनेक भारतीय उद्योगसमूहांनी आपली उत्पादने सादर केली आहेत. भारतीय कंपन्यांनी या मेळाव्यात यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला आहे.अँजेला मर्केल यांच्यासाठी मँगो लस्सीजर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्यासाठी मँगो लस्सी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी गुजराती पदार्थ खांडवी, ढोकळा आणि खाकरे अशी मेजवानी हॅनोव्हर ट्रेड फेअरमधील इंडिया पॅव्हिलियनमध्ये आयोजित केली होती. हॅनोव्हर फेअरमध्ये ४५ भारतीय शेफ काम करत असून, उपस्थित असणाऱ्या ३ हजार भारतीयांना खास भारतीय पदार्थांची चव चाखवत आहेत. रविवारी रात्री पंतप्रधान मोदी व चॅन्सेलर मर्केल यांनी एकत्र भोजन घेतले. त्यावेळी भारतातील विविध हॉटेलचे मुख्य शेफ विविध पदार्थ सादर करत होते. या मेजवानीस २ हजार निमंत्रित उपस्थित होते. हॅनोव्हर ट्रेड फेअरमध्ये गुंतवणूकदार आमच्या मेजवानीकडे आकर्षित होतील.