शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्पविरोधात महाभियोगाची तयारी

By admin | Updated: June 9, 2017 03:45 IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग आणण्याची तयारी अमेरिकी काँग्रेसमधील डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी सुरू केली

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड होऊन सहा महिने होत नाहीत तोच डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग आणण्याची तयारी अमेरिकी काँग्रेसमधील डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी सुरू केली आहे. ‘फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिगेशन’च्या (एफबीआय) संचालकपदावरून जेम्स कॉमी यांची हकालपट्टी करण्याची ट्रम्प यांची कारवाई हा न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप असल्याच्या मुद्द्यावरून हा महाभियोग आणण्याचा विचार आहे.ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवायला हवा, अशी मागणी गेल्या महिन्यात प्रतिनिधी सभेत करणारे टेक्सास राज्याचे डेमोक्रॅटिक प्रतिनिधी अल ग्रीन यांना कॅलिफोर्नियातील प्रतिनिधी ब्रॅड शेरमन यांची साथ मिळाली आहे. ते काँग्रेसमध्ये महाभियोग आणण्याची पावले टाकतील, अशी अपेक्षा आहे.ही दीर्घ प्रक्रियेची सुरुवात आहे, असे स्पष्ट करून अल ग्रीन म्हणाले की, ज्यांना माहीत नाही, त्यांच्यासाठी हे सांगावेसे वाटते की, महाभियोग आणल्याने राष्ट्राध्यक्ष दोषी ठरतीलच असे नाही. प्रतिनिधी सभा राष्ट्राध्यक्षांविरुद्ध आरोप ठेवेल. अगदी तंतोतंत तसे नसले तरी फौजदारी खटल्यात आरोप निश्चित करण्यासारखेच हे आहे.महाभियोगाची मागणी केल्यानंतर आपल्याला धमकीचे फोन आणि संदेश आले, असाही आरोप त्यांनी केला असून कॅपिटॉल हिल पोलीस त्याचा तपास करीत अहेत. मात्र डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे असे आहे की, सदस्यांनी घाई करू नये. कॉमी यांना पदावरून दूर केले जाण्याच्या संदर्भात सुरू असलेला तपास पूर्ण होऊ दिला जावा, जेणेकरून त्यातून ट्रम्प व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात अधिक माहिती हाती येऊ शकेल. राष्ट्राध्यक्षांनी न्यायप्रक्रियेत अडथळा आणला असे सिद्ध झाल्यास तो महाभियोगासाठी प्रबळ विषय होऊ शकतो. प्रत्यक्षात त्या दिशेने पाऊल टाकण्यापूर्वी ते थोडे सबुरीने घेऊ इच्छितात.मात्र महाभियोग प्रस्तावाची कोणतीही औपचारिक नोटीस ग्रीन यांनी अद्याप प्रतिनिधी सभेतील बहुमताच्या नेत्या नॅन्सी पॉवेल किंवा इतरांना दिलेली नाही. (वृत्तसंस्था)>काहीही फरक नाहीट्रम्प यांना महाभियोगास सामोरे जायलाच हवे ही भूमिका ठामपणे मांडताना ग्रीन म्हणाले की, कोणताही विधिनिषेध न बाळगता राष्ट्राध्यक्ष न्यायप्रक्रियेत खोडा घालू शकतात का, हा खरा प्रश्न आहे. ग्रीन म्हणाले की, कॉमी यांनी काहीही जबानी दिली तरी ट्रम्प यांची कृती न्यायप्रक्रियेतील अडथळाच आहे. तपासातून काहीही निष्पन्न झाले तरी यात काहीही फरक पडणार नाही.