शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाची ठाणी, विमानतळही ताब्यात

By admin | Updated: June 24, 2014 02:18 IST

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी इराकच्या दौ:यावर आले असून, त्यांच्या समोरच सुन्नी बंडखोरांनी महत्त्वाची ठाणी व विमानतळ ताब्यात घेत संपूर्ण उत्तर इराक आपल्या कब्जात घेतला.

बगदाद : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी इराकच्या दौ:यावर आले असून, त्यांच्या समोरच सुन्नी बंडखोरांनी महत्त्वाची ठाणी व विमानतळ ताब्यात घेत संपूर्ण उत्तर इराक आपल्या कब्जात घेतला. 
केरी यांचा इराक दौरा गुप्त ठेवण्यात आला होता. केरी यांनी पंतप्रधान नूरी अल-मलीकी यांची भेट घेतली, तसेच ते इराकमधील सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतील. इराकला मदत करण्यासाठी अमेरिकेची काय योजना आहे, याची माहिती केरी सर्व नेत्यांना देतील. इराकी नेत्यांनी पुढे येऊन नवे सरकार बनवावे असा केरी यांचा प्रस्ताव   आहे. 
इराकचे सुरक्षा दल बंडखोरांच्या ताकदीसमोर कमी पडत असून, बंडखोरांनी आपले बळ एकवटत केरी यांच्यासमोर नवा प्रांत ताब्यात घेतला आहे. बंडखोरांच्या ताब्यातील पाच शहरांतून हजारो लोक विस्थापित होत असून, देश फुटण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. 9 जून रोजी सुरू झालेल्या या आक्रमणात शेकडो इराकी सैनिक मरण पावल्याचे मलिकी यांच्या प्रवक्त्याने सांगितले. 
जिहादीस्ट इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट-  इसील या बंडखोर संघटनेने उत्तरेकडे आपले बळ एकवटले असून, शिया नागरिकांची मोठी संख्या असणारे तल अफार हे शहर व विमानतळ आज ताब्यात घेतले आहे. गेले काही दिवस या शहरासाठी संघर्ष चालला होता. तेथून सैनिक बाहेर पडताना दिसत आहेत. बंडखोरांचा नेता लेफ्ट. जनरल क्वासिम अट्टा याने टीव्हीवर ही घोषणा केली आहे. गेल्या आठवडय़ात बंडखोरांनी अंबर प्रांतातील रवा व अॅना ही शहरे ताब्यात घेतली                 होती.  (वृत्तसंस्था)