शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

तुमच्या भेटीला कधीही येईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:41 AM

किम जोंग ऊन; ६५ वर्षांचे वैर संपले, मैत्रीचा हात!

सोल (दक्षिण कोरिया) : ‘तुम्ही मला कधीही बोलवा, मी तुमच्या भेटीला येईन,’ असे कोरियाचे नेते किम जोंग ऊन यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन यांना शुक्रवारी म्हणाले. या दोन देशांच्या प्रमुखांची तब्बल ६५ वर्षांनी भेट झाली.मध्यंतरी उत्तर कोरियात किम यांनी ज्या क्षेपणास्त्र चाचण्या केल्या, त्यामुळे सारे जग हादरून गेले होते. अमेरिकेने उत्तर कोरियावर निर्बंधही जाहीर केले होते. मात्र, चीनच्या मध्यस्थीनंतर किम यांनी चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला आणि दक्षिण कोरियातही जाण्याचे ठरवले. अमेरिकेने या भेटीचे स्वागत केले असले तरी दोन देशांचे संबंध सुधारण्याचे सारे श्रेय चीनलाच दिले जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व किम जोंग ऊन यांच्यातील भेटीचा मार्ग त्यामुळे खुला होणार आहे.कोरियन युद्धाचा१९५३ मध्ये शेवट झाल्यानंतर दक्षिण कोरियाला भेट दिलेले उत्तर कोरियाचे किम जोंग हे पहिले नेते ठरले. किम म्हणाले,‘सीमा काही फार उंच नाही. लोक जर ये-जा करीत राहिले तर तीही दिसेनाशी होईल.’ ‘आमची शिखर परिषद झाल्यावर आमच्या भेटी प्योंगगँग, सोल, जेजू बेट आणि पाएक्तू डोंगरात होतील अशी मला आशा आहे,’ असे मून म्हणाले.उभय नेत्यांची भेट लष्कर नसलेल्या पॅनमुनजोम येथील पीस हाउसमध्ये झाली. याच भागाने दक्षिण व उत्तर कोरिया अशी विभागणी केलेली आहे.‘ब्लू हाउसला तुम्ही आलात तर यापेक्षा अधिक चांगली दृश्ये दाखवीन,’ असे मून म्हणाल्यावर किम जोंग म्हणाले की, ‘तुम्ही मला बोलावल्यास मी कधीही ब्लू हाऊसला केव्हाही येईन.’ (वृत्तसंस्था)ऐतिहासिक भेटवॉशिंग्टन : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन व दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन यांच्यातील भेट ऐतिसासिक असून, ती कोरियन द्वीपकल्पासाठी प्रगती, शांतता व समृद्धीची ठरेल, अशी आशा अमेरिकेने व्यक्त केली.

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उन