शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

स्वर्गात जायचे असेल तर आत्मघातकी बॉम्ब हो...

By admin | Updated: December 27, 2014 00:04 IST

नायजेरियात एका १३ वर्षांच्या मुलीला स्फोटके बांधलेल्या अवस्थेत पकडण्यात आले असून, बोको हरामने आपल्याला स्फोट करण्यासाठी पाठवले असा तिचा दावा आहे.

कानो, नायजेरिया - नायजेरियात एका १३ वर्षांच्या मुलीला स्फोटके बांधलेल्या अवस्थेत पकडण्यात आले असून, बोको हरामने आपल्याला स्फोट करण्यासाठी पाठवले असा तिचा दावा आहे. जोहरा बाबनगिडा असे तिचे नाव असून, तिच्या बापानेच तिला बोको हरामच्या ताब्यात दिले होते, असे तिने सांगितले. नायजेरियात लहान मुली व महिलांनी अनेक आत्मघातकी हल्ले केले असून, मोठ्या प्रमाणावर रक्तपात झाला आहे. त्यावरून दहशतवादी आत्मघातकी हल्ल्यासाठी अपहरण केलेल्या मुलींचा वापर करत असल्याचे लक्षात आले आहे. बुधवारी स्फोटकांचा स्फोट करण्यास नकार देणाऱ्या एका १३ वर्षाच्या मुलीला कानो येथे अटक करण्यात आली. रात्री तिने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार बोको हरामच्या शिबिरात तिच्या वडिलांनीच तिला नेले होते. तिथे अनेक लोकांना जिवंत पुरताना पाहिल्याचे जोहराने सांगितले. त्यानंतर जोहराची पाळी आली तेव्हा तिला स्वर्गात जायचे आहे काय? असे विचारण्यात आले, स्वर्गात जायचे असेल तर तुला आत्मघातकी बॉम्ब बनावे लागेल, मृत्यूनंतर तू स्वर्गात जाशील असे जिहादी सदस्यांनी तिला सांगितले. तिने मरण्यास नकार दिला, तेव्हा तिला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. मला जिवंत पुरले जाण्याची भीती वाटली, म्हणून मी स्फोटके बांधून घेतली असे या मुलीने सांगितले. नायजेरियात इस्लामी स्टेट निर्माण करण्यासाठी बोको हरामचा संघर्ष चालू आहे. दोन मुलींनी गेल्या आठवड्यात कानोच्या बाजारात स्वत:चा स्फोट घडवून आणला होता. त्यात या मुलींसह चारजण ठार झाले होते व सात जखमी झाले होते. एप्रिल महिन्यात बोको हरामने चिबॉक शहरातील निवासी शाळेतून २७६ मुलींचे अपहरण केले होते. त्यातील काही मुली निसटल्या; पण २१९ मुली अजूनही बेपत्ता आहेत. या मुलींचे धर्मांतर केले असून, त्यांचे विवाह बोको हरामच्या सदस्यांशी लावण्यात आल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)