शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

संधी असती तर तिसऱ्यांदाही जिंकू शकलो असतो : ओबामा

By admin | Updated: December 28, 2016 02:24 IST

‘माझ्या पुरोगामी बदलांच्या दृष्टिकोनाला आजही अमेरिकनांची पसंती असून, तिसऱ्या वेळेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास मी पात्र असतो, तर जिंकलो असतो,’

वॉशिंग्टन : ‘माझ्या पुरोगामी बदलांच्या दृष्टिकोनाला आजही अमेरिकनांची पसंती असून, तिसऱ्या वेळेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास मी पात्र असतो, तर जिंकलो असतो,’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केला. ओबामा म्हणाले, ‘या दृष्टिकोनाबद्दल मला आत्मविश्वास असून, मला जर तिसऱ्यांदा निवडणूक लढवायची संधी असती, तर मी बहुसंख्य अमेरिकनांना माझ्या पाठिशी उभे करू शकलो असतो.’ ओबामा यांनी त्यांचे माजी वरिष्ठ सल्लागार डेव्हिड अक्सेलरॉड यांना ‘द अ‍ॅक्स फाइल्स’ या पॉडकॉस्टसाठी मुलाखत दिली. मुलाखतीची निर्मिती युनिव्हर्सिटी आॅफ शिकागो इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटिक्स आणि सीएनएनची आहे. ओबामा म्हणाले, ‘देशभर लोकांशी माझे जे संभाषण झाले, भलेही त्यातील काही लोक माझ्याशी सहमत नव्हते, तरी तुमचा जो दृष्टिकोन आहे, जी दिशा तुम्ही दाखवत आहात ती बरोबर आहे, असे त्यांनी मला सांगितले.’ ५० मिनिटांच्या या मुलाखतीत ओबामा यांनी डेमोक्रॅट्सनी काही मतदारांकडे दुर्लक्ष केले व त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाले, हे वारंवार सूचित केले. आर्थिक व्यवस्थेचे लाभ आपल्याला झाले नाहीत, अशी भावना झालेल्या अमेरिकनांकडे हिलरी क्लिंटन यांच्या प्रचार मोहिमेने पुरेसा स्पष्ट युक्तिवाद केला नाही, असे ओबामा यांना सूचित करायचे होते. ‘जर तुम्ही मी जिंकणार असा विचार करीत असाल, तर खेळात होते तशी तुमच्यामध्ये ती भावना निर्माण होते. भलेही मग तुम्ही सुरक्षितपणेही खेळत असाल,’ असे ओबामा म्हणाले. ‘क्लिंटन यांनी अतिशय कठीण परिस्थितीत खूप चांगली कामगिरी केली व प्रसारमाध्यमांनी त्यांना चुकीची वागणूक दिली,’ असेही ओबामा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)ट्रम्प यांचे प्रत्युत्तरओबामा यांनी मी अध्यक्षपदाची निवडणूक तिसऱ्यांदाही जिंकू शकलो असतो, हा केलेला दावा नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी खोडून काढला. ट्रम्प यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ओबामा यांनी तसे म्हणावे, परंतु मी म्हणेन की ते कधीही शक्य नव्हते. संयुक्त राष्ट्र गप्पांचा क्लब संयुक्त राष्ट्रात खूप क्षमता आहे, पण हा एक क्लब बनून गेला आहे. हे दुर्भाग्य आहे.अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रावर टीका करताना म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र हा असा क्लब आहे, जिथे लोक भेटण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आणि वेळ घालविण्यासाठी येतात. ट्रम्प यांनी टिष्ट्वट केले आहे की, संयुक्त राष्ट्रात खूप क्षमता आहे, पण हा एक क्लब बनून गेला आहे. हे दुर्भाग्य आहे. वेस्ट बँक आणि येरुशेलमच्या काही भागांत इस्त्रायलच्या प्रभावाबाबत संयुक्त राष्ट्र संघाने एक निषेध करणारा प्रस्ताव आणला आहे. या मतविभाजनात सहभागी न होण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे हे विधान आले आहे. ७१ वर्षे जुन्या या संस्थेलाच ट्रम्प आगामी काळात आव्हान देऊ शकतात, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.