शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

27 ऑक्टोबरला निवडणुका झाल्या असत्या तर मी राष्ट्रपती असती- हिलरी क्लिंटन

By admin | Updated: May 3, 2017 16:47 IST

अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवास

ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. 3 - अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवास अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा(एफबीआय),  विकिलीक्स आणि रशीयाच्या हॅकर्सना जबाबदार धरलं आहे. न्यू यॉर्कमध्ये ‘वुमन फॉर वुमन इंटरनेशनल फोरम’ या कार्यक्रमात सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत त्या बोलत होत्या.
 
जर 27 ऑक्टोबरला निवडणुका झाल्या असत्या तर मी तुमची राष्ट्रपती असती. पण असं झालं नाही.  28 ऑक्टोबरला एफबीआयचे संचालक जिम कॉमेचं पत्र आणि रशिया विकिलीक्सच्या मेलने  जे लोक मला मतदान करणार होते, त्या लोकांच्या मनात माझ्याबद्दल या लोकांनी संशय निर्माण केला. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत मी 30 लाख मते जास्त घेतली होती. परंतु, नंतर इलेक्टोरेल मतदानात ट्रम्प विजयी झाले. 
 
प्रचारादरम्यान माझ्या वैयक्तिक इ-मेल्स हॅकिंगमागे रशियाची भूमिका आणि विकिलिक्सने एकामागोमाग माझ्याबाबतचे प्रकरणं सादर करण्याच्या वेळेत साधर्म्य असल्याबाबतही हिलरी यांनी शंका व्यक्त केली.  
पुन्हा निवडणूक लढवणार नाही-
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर हिलरी पुन्हा कोणतीही निवडणूक लढवणार नाही. न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत हिलरी उतरू शकतात असं वृत्त मध्यंतरी आलं होतं त्यावर  मूळ भारतीय असलेल्या त्यांच्या सहकारी नीरा टंडन यांनी  हिलरी पुन्हा कोणतीही निवडणूक लढवणार नाही.