शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत मुलींची ओळख पटली चित्रफितीवरुन पालकानी शोधल्या आपल्या मुली

By admin | Updated: May 14, 2014 00:25 IST

नायजेरियातील शाळेतून अपहरण करण्यात आलेल्या २०० हून अधिक मुलींची चित्रफीत बोको हरामने प्रसिद्ध केल्यानंतर, पालक आपापल्या मुलींना शोधत असून, त्यापैकी काही मुलींची ओळख पटल्याचे सांगण्यात येत आहे.

लागोस- नायजेरियातील शाळेतून अपहरण करण्यात आलेल्या २०० हून अधिक मुलींची चित्रफीत बोको हरामने प्रसिद्ध केल्यानंतर, पालक आपापल्या मुलींना शोधत असून, त्यापैकी काही मुलींची ओळख पटल्याचे सांगण्यात येत आहे. २७६ मुलींचे अपहरण करण्यात आले असून, त्यातील १३० मुलींचे धर्मांतरण करून त्यांना मुस्लिम बनविण्यात आले आहे. ज्या मुलींचे धर्मांतर झालेले नाही, त्या मुली तुरुंगात असणार्‍या दहशतवाद्यांच्या बदल्यात दिल्या जातील असे बोको हरामने म्हटले आहे. नायजेरिया सरकारने प्रथम दहशतवाद्यांना सोडण्यास नकार दिला होता, पण आता सरकार सर्व पर्यायावर विचार चालू असल्याचे सांगत आहे. दरम्यान, या मुलींचा शोध घेण्यासाठी अमेरिकेने टेहळणी विमाने तैनात केली आहेत. चित्रफितीचे २७ मिनिटांचे फूटेज चिबॉकमधील लोकांना सोमवारी सायंकाळी दाखविण्यात आले. फूटेजमध्ये दिसणार्‍या सर्व मुली चिबॉकच्या नाहीत. कारण एप्रिल महिन्यात मुलींची शाळेतील अंतिम वर्षाची परीक्षा होती. त्या परीक्षेसाठी आजुबाजूच्या गावातूनही मुली या शाळेत आल्या होत्या. मुलींच्या मैत्रिणींनी चित्रफितीतील तीन मुलींना ओळखले आहे. एका आईनेही हिजाब घातलेल्या आपल्या मुलीला ओळखले आहे. अपहरण झालेल्या बहुतांश मुली ख्रिश्चन आहेत, त्यांना इस्लाम धर्म स्वीकारावा लागला आहे. बोको हरामचा नेता अबूबकर शेकाऊ याने तुरुंगातील सहकार्‍यांच्या बदल्यात मुली सोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जोपर्यंत तुम्ही आमच्या मित्रांची सुटका करणार नाही, तोपर्यंत मुली तुम्हाला पुन्हा दिसणार नाहीत असा इशारा त्याने दिला आहे. मुलींच्या सुटकेसाठी सर्व पर्यायांवर विचार चालू असल्याचे नायजेरियन सरकारने म्हटले आहे, गेल्या आठवड्यात मुलींना गुलाम म्हणून विकून टाकले जाईल, असे अबूबकरने म्हटले आहे. नायजेरियात मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ जमले असल्याने या मुलींच्या सुटकेबद्दल वाटाघाटी केल्या जाण्याची शक्यता आहे. बोको हरामचा मुलींना पाश्चात्त्य शिक्षण देण्यास विरोध आहे. या मुली शाळेत नको होत्या, त्यांचे लग्न व्हायला हवे होते असे या संघटनेचे म्हणणे आहे.